सोलापूर प्रतिनिधी । मंगळवेढ्याचे माजी आमदार दिवंगत किसनलाल मर्दा यांच्या डॉक्टर मुलाला बेकायदा गर्भपात प्रकरणी अटक झाल्यान खळबळ उडाली आहे. कुंभार गल्ली परिसरातील मर्दा नर्सिंग होम आणि एक्स-रे क्लिनिक येथे बेकायदेशीर गर्भपात होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी ६७ वर्षीय डॉ. श्रीकांत किसनलाल मर्दा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. श्रीकांत मर्दा यांनी ११ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान तीन महिलांकडून बेकायदेशीरित्या गर्भपात करण्याच्या उद्देशाने मोठी रक्कम स्वीकारली होती. खोटे वैद्यकीय अहवाल तयार करुन महिलांच्या गर्भातील तीन ते साडेतीन महिने वयाच्या लहान मुलींना डॉ. मर्दा यांनी आजारी दाखवलं. त्यानंतर त्यांचा गर्भपात घडवून आणला. पैसे उकळण्याचा उद्देशाने हा सगळा प्रकार घडवू आणला गेला आहे.
डॉ. श्रीकांत मर्दा यांच्याविरोधात पोलिसांनी एमटीपी १९७१ कायद्यामधील तरतुदींचे उल्लंघन करुन बेकायदेशीररित्या गर्भपात केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच इंजेक्शनच्या रिकाम्या अँम्पुल्स पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने एका पत्र्याच्या डब्यात जाळून टाकल्या प्रकरणीही गुन्हा दाखल केला आहे. यामागे मोठं रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय असून याप्रकरणी मंगळवेढा पोलीस अधिक तपास करत आहेत.
इतर काही बातम्या-
अहमदनगर मध्ये स्त्री जातीचे मृत अर्भक नदीत आढळले
वाचा सविस्तर – https://t.co/GIx1AHch9T@bjp4ahemadnager @DGPMaharashtra @PuneCityPolice #crimeandpunishment #crimenews
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 12, 2019
आदित्यला उदयनराजेंची ‘जादू की झप्पी’
सविस्तर वाचा – https://t.co/dILOEwAVFV@Chh_Udayanraje @ShivsenaComms @ShivSena @udayanraje007 #vidhansabha2019#MaharashtraAssemblyPolls
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 12, 2019
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची फडणवीस सरकारविरुद्ध नाराजी; भ्रष्टाचारी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी
वाचा सविस्तर – https://t.co/lNlZufZLBS@Dev_Fadnavis @ChDadaPatil #mpsc#spardhaparikshya
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 12, 2019