राजीव गांधींच्या हत्येच्या कटातील दोषी नलिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वेल्लोर  । भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधींची मारेकरी नलिनी हिने तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सोमवारी रात्री नलिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती तिच्या वकिलाने दिली आहे. नलिनी गेल्या २९ वर्षांपासून तामिळनाडूमधील वेल्लोर तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तिथेच नलिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

गेल्या २९ वर्षात पहिल्यांदाच नलिनीने अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं तिच्या वकिलाने सांगितलं आहे. नलिनीचं तिच्यासोबत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यासोबत भांडण झालं होतं. यानंतर इतर कैद्यांनी हे प्रकरण जेलरपर्यंत नेलं होतं. यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं वकिलाने सांगितलं आहे. यावेळी त्यांनी यामागील खरं कारण समोर आलं पाहिजे अशी मागणीही केली आहे.

दरम्यान, राजीव गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी दोषी नलिनीसोबत कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तिच्या पतीने फोन करुन नलिनीला दुसऱ्या तुरुंगात हलवलं जावं अशी मागणी वकिलाकडे केली आहे. यासाठी लवकरच कायदेशीर विनंती करणार असल्याची माहिती वकिलाने दिली आहे.२१ मे १९९१ रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकऱणी नलिनी आणि तिच्या पतीसहित एकूण ७ जणांना विशेष टाडा कोर्टाने दोषी ठरवलं होतं. त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर फाशीची शिक्षा माफ करून जन्मठेपेत रुपांतर करण्यात आलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment