भानुशाली इमारत दुर्घटना: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी दाखल

मुंबई । छत्रपती शिवाजी टर्मिनस भागात असलेल्या भानुशाली इमारतीचा भाग कोसळला असून या दुर्घटनेत आतापर्यत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ४ जण जखमी आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इमारत दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी नेमकं काय काय घडलं त्याची माहिती घेतली. पोलीस आयुक्तांशी त्यांनी चर्चा केली. त्याचप्रमाणे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

महापालिका आयुक्त इक्बाल चहेल यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते त्यांनी भानुशाली इमारत दुर्घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, क्रेनच्या सहाय्याने आत्तापर्यंत १२ लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखालून ६ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. त्यापैकी ४ जण जखमी आहेत. तर दोघांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”