व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शहरातून पुन्हा चार दुचाकी चोरीला

औरंगाबाद : शहरात अनेक भागातून दुचाकी चोरीची घटना समोर येत आहे. शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत जात असल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. चोरी झालेल्या चार दुचाकींची नोंद करण्यात आली आहे.

बळीराम तांबे (३६,रा.सिंगापूर कॉम्प्लेक्स, गोमटेश मार्केट रोड) यांची दुचाकी (एमएच २० बीझेड ५७०९) ही दुचाकी गोमटेश मार्केटच्या पार्किंगमधून चोरून नेण्यात आली. त्यानंतर योगेश सोमनाथ राऊतराव (२६,रा.निधोना,ता.फुलंब्री ह.मु.रामनगर, हर्सूल) याची दुचाकी (एमएच २० एफएस ५३५२) ही दुचाकी रामनगर भागातून घरासमोरून उचलून नेली. अरुण आडे (४२,रा.हरिराम नगर,बीड बायपास) यांची दुचाकी (एमएच २० ईक्यू ७७४४) हे दुचाकी बीड बायपासवरील महिंद्रा शोरूम समोरून चोरण्यात आली.

याशिवाय राहुल प्रल्हाद नवाळे (३५, रा.राधा कृष्ण अपार्टमेंट, मिटमीट) यांची दुचाकी (एमएच १७ बीई ७७४६) अशा चार दुचाक्या अज्ञातांनी घरासमोरून चोरून नेली आहे. या घटनेची कारवाही छावणी, क्रांतिचौक, हर्सूल आणि सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.