दसरा मुहूर्तावर फ्रान्सने केले राफेल भारताला सुपूर्द, राजनाथ सिंह यांच्या उपस्थित पार पडला सोहळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 टीम, HELLO महाराष्ट्र| आज दसऱ्याच्या मुहूर्तावर राफेल लढाऊ विमान फ्रान्सने भारताला सुपूर्द केलं. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून पहिलं राफेल विमान स्वीकारलं. यावेळी राजनाथ सिंह यांनी या विमानाची पूजा केली. फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईतळावर राफेल हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. हस्तांतरण सोहळ्या वेळी भारताचे हवाईदलप्रमुख हरजीत सिंह अरोरा सुद्धा उपस्थित होते. राफेल हा फ्रेन्च शब्द असून त्याचा अर्थ धुळीचे वादळ असा होतो. मला खात्री आहे, नावाप्रमाणे नक्कीच हे विमान वादळ निर्माण करेल, अशा भावना राजनाथ यांनी यावेळी व्यक्त केल्या.

तत्पूर्वी, बार्डोक्स हवाईतळावर राफेल निर्मिती कंपनी दसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी राजनाथ यांचं स्वागत केलं. त्यानंतर राफेल लढाऊ विमानाच्या हस्तांतरणाची औपचारिकता पार पडली. यावेळी बोलताना राजनाथ यांनी भारतासाठी हा ऐतिहासिक दिन असल्याचे सांगितले. आज भारतात सर्वत्र विजयादशमी साजरी होत आहे. अपप्रवृत्तींचा विनाश करून सत्प्रवृत्तीचा विजयोत्सव साजरा करण्याचा हा दिवस आहे. योगायोग म्हणजेच आजच वायुसेना दिनही आहे. अशा या शुभदिनी राफेल भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात येत असून हवाईदल यामुळे अधिक शक्तिशाली होणार आहे, असा विश्वास राजनाथ यांनी व्यक्त केला.

राफेलची निर्मिती दसॉल्ट या फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. तसंच यावर मिटिऑर आणि स्काल्प क्षेपणास्त्र तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. फ्रान्स भारताला ३६ राफेल विमानं देणार आहे.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment