सातारा प्रतिनीधी । शुभम बोडके
पाचगणी येथील रोजलँड स्कुल विरोधात आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अहमदनगर येथील तिघांविरोधात महाबळेश्वर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पाचगणी पोलीसात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्हाच्या घटनेमुळे पाचगणी शहरात खळबळ उडाली आहे.
ईर्शाद ताजुद्दीन (रा. डोंगरी म्युनिसिपल गोडाउन नंबर एक महेश्वरी रोड मुंबई) यांनी दिलेलया फिर्यादीनुसार अभय जगन्नाथ आगरकर (रा. अहमदनगर) सुलतान दुले खान शेख (रा. अहमदनगर) तसेच संशयीत आरोपी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता फसवणूक करण्याच्या उद्देशाने 30 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
या प्रकरणी अभय जगन्नाथ आगरकर, सुलतान दुले खान शेख तसेच संशयीत आरोपींनी रोजलँड इंटरनॅशनल स्कूल सिद्धार्थ नगर पाचगणी शाळेस हॉस्टेल किराणा मालाचा पुरवठा करण्याकरिता प्रोत्साहीत केले तसेच खोटे आमीष दाखवून तीस लाख रुपयांचा एका बँकेचा चेक दिला. चेक न वटल्यामुळे पैसे परत न दिल्याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी महाबळेश्वर येथे खबर दिली. त्यानंतर आज पाचगणी पोलीस ठाण्यात कागदपत्रे दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास पोलीस हवालदार पांब्रे करीत आहेत.