वसईतील बिअर बारमध्ये वेटर आणि ग्राहकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वसई : हॅलो महाराष्ट्र – वसईतील एका बिअर बारचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये वेटर आणि ग्राहकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी (Freestyle fighting) झाल्याचे पाहायला मिळत आहे. वसईच्या या बिअर बारमध्ये बिअर पिण्यावरून वाद सुरू झाला आणि काहीच वेळात त्याचे रूपांतर हाणामारीत (Freestyle fighting) झाले. या घटनेचा व्हिडिओ त्या ठिकाणी उभा असलेल्या कोणीतरी शूट केला आहे. जो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके ?
ही घटना वसईच्या लक्ष्मी बारमध्ये घडली आहे. यात मद्यधुंद व्यक्तीने वेटरसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. पुढे हा वाद मोठ्या प्रमाणात वाढल्याने या मद्यधुंद व्यक्तीला बारमधून बाहेर काढण्यात आलं. मात्र तरीही तो शांत बसला नाही आणि वाद मोठ्या प्रमाणात वाढला. अखेर या वादाचे रूपांतर हाणामारीत (Freestyle fighting) झाले. मद्यधुंद व्यक्ती समजावूनही ऐकत नसल्याचे पाहून बिअर बारमधील वेटरदेखील भडकला. यानंतर वेटरने या व्यक्तीला धू-धू धुतलं.

बारसमोर असलेल्या रस्त्यावरच ही हाणामारी (Freestyle fighting) सुरू झाली. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि रस्त्यावरच काही लोकांच्या गटाने एका व्यक्तीला घेरलं आहे आणि त्याला मारहाण (Freestyle fighting) केली जात आहे. हे लोक या व्यक्तीला रस्त्यावरुन खेचत बारजवळ आणतात. यावेळी आजूबाजूला लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. या हाणामारीचा (Freestyle fighting) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
ENG vs NED : इंग्लंडने वनडे मध्ये 498 रन करत रचला वर्ल्ड रेकॉर्ड

सध्याच्या घसरणीच्या काळात 100 टक्क्यांहून जास्त रिटर्न देणाऱ्या ‘या’ शेअर्सवर एकदा नजर टाकाच !!!

अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांनी रेल्वेला आग लावली तसेच स्टेशनवरील स्टॉलही लुटला

‘या’ 5 खाजगी बँकाकडून बचत खात्यावर मिळत आहे सर्वाधिक व्याज !!!

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी धरला पंजाबी ढोलवर ठेका

Leave a Comment