Friday, January 27, 2023

पाकिस्तानला मोफत लस मग देशाला का नाही? नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर निशाणा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: देशात करोनाची परिस्थिती अधिकच बिकट बनलेली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. लसीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानला भारताने फुकट लस दिली मग देशातील नागरिकांना का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यात त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले ‘ कोरोनाची लस पुण्यात तयार होते त्यामुळे पुण्यात पत्रकार परिषद घेत आहे. केंद्र सरकारला लस १५० रुपयांना द्यायची आणि तीच राज्यांना ४०० रुपयांना या मुद्द्यावर त्यांनी आक्षेप घेतला. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले या मुद्द्यावर मी आंदोलनच करणार होतो पण कोरोनाच्या या परिस्थितीमुळे आंदोलन टाळलं. असे ते म्हणाले.

- Advertisement -

लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांची माक्तदारी

केंद्रानं दोनच कंपन्यांना लस निर्मितीची परवानगी दिली. त्यामुळे यामध्ये कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. आता नागरिकांना लस पुरवणे ही केंद्राची जबाबदारी आहे. असंही पटोले म्हणाले. तसेच देशात लसीकरण मोफत झालं पाहिजे ते केंद्रसरकारने करावं. नागरिकांना लस पुरवणे ही केंद्राची जबाबदारी आहे असे त्यांनी म्हटले आहे. तसेच याबाबतचे निवेदन त्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांना ही दिले आहे.

पाकिस्तान बाबत बोलताना ते म्हणाले,’ केंद्र सरकार एकीकडे भारताचा शत्रू अशी ओळख असलेल्या पाकिस्तानला मोफत लस देते आहेत. मात्र देशातील नागरिकांना त्यासाठी पैसे मोजायला सांगत आहे. देशाला लस मोफत का देत नाही ? असा प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केला. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले पूनावाला हे कोणाचे मित्र आहे त्या भानगडीत मला पडायचं नाही. सरकारनं नागरिकांसाठी मोफत लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पटोल यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच लसीच्या पुरवठा मध्ये निर्माण होणारा तुटवडा यामागं नफेखोरीचा प्रकार असल्याचा संशय देखील पटोले यांनी व्यक्त केला आहे.