Sunday, March 26, 2023

भारताने मोडला कोरोना रुग्णवाढीचा आपलाच विश्वविक्रम; एका दिवसांत आढळले ८३ हजार ८८३ नवीन रुग्ण

- Advertisement -

नवी दिल्ली । देशातील अनेक राज्यांची स्थिती कोरोनाशी लढा देताना गंभीर बनली आहे. विशेषतः मागील काही महिन्यात देशातील रुग्णसंख्ये प्रचंड वाढ झाली असून, दिवसेंदिवस संकट गंभीर बनत चाललं आहे. त्यातच बुधवारी (२ सप्टेंबर) देशात एका दिवसात तब्बल ८३ हजार ८८३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या वाढीबरोबरच जगात एका दिवसात इतके रुग्ण आढळून येणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी या स्थानी भारतच होता. आतापर्यंत तिसऱ्यांदा भारतात ८० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळं भारताने आज स्वतःचाचं नकोस वाटणारा हा विक्रम मोडीत काढला आहे. चिंतेची बाब म्हणजे मागील ४ दिवसांतच इतक्या मोठ्या प्रमाणात हे रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, एका दिवसात ८३ हजार रूग्णसंख्या आढळणारे भारताशिवाय जगातील एकही राष्ट्र नाही. काही दिवसांपूर्वी ही विक्रमी नोंद अमेरिकेच्या नावे होती. अमेरिकेत एका दिवसात आतापर्यंत सर्वाधिक ७७ हजार २५५ रुग्ण आढळून आले आहेत. १६ जुलै रोजी ही नोंद झाली होती. दुर्दैवानं अमेरिकेला मागे टाकत भारत २९ ऑगस्ट रोजी ७८ हजार ९०३ रुग्णवाढीसह पहिल्या स्थानी पोहोचला होता.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासात देशातील करोना रुग्णांच्या संख्येत ८३ हजार ८८३ नवीन रुग्णांची भर पडली. त्याबरोबर १ हजार ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या ३८ लाख ५३ हजार ४०७ इतकी झाली आहे. यात ८ लाख १५ हजार ५३८ रुग्ण उपचार घेत आहेत. तर २९ लाख ७० ४९३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशातील एकूण मृतांचा आकडाही वाढत असल्याचं दिसत असून आतापर्यंत ६७ हजार ३७६ जणांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.