महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? चंद्रकांत दादांनी उडवली राऊतांच्या विधानाची खिल्ली

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात फक्त ठाकरे ब्रँड असून हा ब्रँड घालवण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा आरोप भाजपवर केला होता. राऊतांच्या या विधानाची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दाखल घेत खाल्ली उडवली आहे. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? असा उपरोधक सवाल करतानाच महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच ब्रँड आहेत. त्याशिवाय कोणताच ब्रँड नाही, असं म्हणतं चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना खोचक टोला लगावला. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

दरम्यान, शिवसेनेने ठाकरे ब्रँडसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घालण्यात आली आहे. त्याबाबत पाटील यांना छेडले असता राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या हाकेला प्रतिसाद द्यावा की देऊ नये हे त्यांच्यावर अवलंबून आहे. मनसेच्या एका नेत्याने शिवसेनेला कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलंही आहे, असंही ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते ठाकरे ब्रँड बद्दल राऊत?
‘राज ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या ठाकरे ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,’ असं म्हणत राऊत यांनी राज ठाकरे यांनाही साद घातली होती.

कुणीही उठावे आणि मुंबई-महाराष्ट्रावर चिखलफेक करावी हे आता तरी थांबले पाहिजे. दिल्ली किंवा महाराष्ट्रात कोणाचेही सरकार असो, एखादी अज्ञात शक्ती आमच्या मुंबईच्या विरोधात पद्धतशीरपणे कारस्थाने करत असते. महाराष्ट्राच्या रक्तातील मराठी पेशी मारण्याचे कारस्थान सुरू आहे. सूर्य, चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे शब्द उच्चारताच वणव्याप्रमाणे पेटून उठणारा मराठी माणूस कायमचा लाचार करण्याचे षड्यंत्र नव्या राजकारणात रचले गेले आहे. मुंबईचे महत्त्व, मुंबईचे वैभव कमी केले की महाराष्ट्राचे आपोआप पतन होईल, असे ज्यांच्या मनात आहे ते मराठी माणसाला कमी लेखत आहेत,’ असा इशारा राऊत यांनी दिला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook