राहुल गांधींनी दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. याच दरम्यान, भाजपाने मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात ‘सेवा सप्ताह’ आयोजन केले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा

खासदार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यंदा भाजपाकडून देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाने देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र या प्रमुख राज्यांसह इतर राज्यांमध्येही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. गरजूंना मदत, रक्तदान शिबिरं, नव्या योजनांची सुरुवात, विविध समाजोपयोगी अभियान अशा विविध कार्यक्रमांचा यामध्ये समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com