उपसभापती संजय गायकवाड यांनी केला बेल एअरच्या भोगळ कारभाराचा पंचनामा : पंचायतसमिती सभा वादळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : कोविड १९ अंतर्गत काही ठिकाणी झालेल्या विशेषतः तळदेव व तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणा बद्दल पंचायत समितीच्या मासिक सभेत झाडाझडती घेणेत आली . उपसभापती संजुबाबा गायकवाड यांनी बेल एअरचा भोगळ कारभाराचा पंचनामा केला.

महाबळेश्वर तालुका हा दुर्गम, डोंगराळ व खूप विस्तृत असा तालुका असून पूर्वी शासकीय आरोग्य सेवा तळागाळातील जनतेला मिळत नव्हती म्हणून शासनाने खासगी संस्था बेल एअर ला ही प्राथमिक केंद्र त्या अखत्यारीत असलेली सर्व उपकेंद्र प्रायोगिक तत्वावर चालवण्यासाठी दिली गेली वर्षे भर याबाबत आढावा घेऊन विचारणा केली तर काही तरी वेळकाढू उत्तरे देऊन कामकाज चालू ठेवण्यात आले परंतु आता पूर्वीचा शासनाचा कारभार चांगला होता असे म्हणायची वेळ आली आहे,शासकीय मंजूर पॅटर्न प्रमाणे डॉक्टर, व इतर स्टाफ ची नियुक्ती बेल एअर ने केलेली नसून मनाने स्टाफ नेमून शासनाचे पॅटर्न प्रमाणे १०० टक्के अनुदान लाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे,

संजूबाबा गायकवाड यांनी उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रतिनिधी यांचेकडून उत्तरे घेण्याचा प्रयत्न केला परंतु काही माहिती संबंधितांना देता आली नाही त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली ,कोम ओरबीड रजिस्टर जिल्हा परिषदेने पुरविले असून बेल एअर च्या स्टाफने परिपूर्ण नोंदी गावामध्ये घेतलेल्या नाहीत,महाबळेश्वर तालुक्यात सगळ्यात जास्त वयोवृद्ध व्यक्ती वास्तव्यास असून त्यांचे सर्वेक्षण, टेम्प्रेचेर,ऑक्सिजन नोंदी व्यवस्थित केल्या जात नाहीत व त्यामुळें त्यांना तातडीची संदर्भ सेवा दिली जात नाही,त्यामुळे या दोन्ही उपकेंद्रातील आरोग्य सेवा पुर्णतः ढेपाळली आहे,नुकतेच तालुक्यातील जेष्ठ नेते,की ज्यांनी सर्वात जास्त काळ पंचायत समितीचे सभापती पद भूषविले आहे अशा आदरणीय व्यक्तीला आरोग्याची संदर्भ सेवा वेळेत मिळाली नसलेने त्यांचे दुःखद निधन झाले आहे याला सर्वस्वी ही संस्था जबाबदार आहे,तळदेव व तापोळा येथील डॉक्टर १ ते दीड महिना परस्पर बेल एअर पांचगणी येथे कार्यरत असतात म्हणजे पगार शासनाचा आणि काम खासगी ठिकाणी,,त्यामुळे आरोग्य सेवेचे बारा वाजले आहेत,नुकतीच शिंदी येथील महिलेने आत्महत्या केली आहे ग्रामस्थांनी याबाबत तिला आरोग्य सेवा न मिळालेने आत्महत्या केली आहे असे सांगितले,, तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकतेच सुरक्षित बाळंतपण न झालेने ३ नवजात अर्भकांचा मृत्यू झाला आहे,याबाबतीत वर्तमानपत्रात बातम्या छापून आलेल्या आहेत,त्यामुळे दुर्गम भागाला ही संस्था वेळेवर व आवश्यक आरोग्य सेवा देत नाही हे सिद्ध होत आहे,ओ पी डी ची संख्या हजारात दाखवून दिशाभूल करनेचा प्रयत्न केला जात आहे,,वास्तविक ज्यांना बीपी,शुगर व नियमीत च्या गोळ्या औषधे चालू आहेत त्यांची ओ पी डी नोंदणी न करता त्यांना औषध पुरवठा करनेचा असून अशा व्यक्तींची नोंदणी केली जात आहे त्यामुळे हा सावळा गोंधळ सुरू आहे,वरिष्ठ अधिकाऱ्यांना यातील कोणत्याही बाजू न दाखवता वरवर चांगले कसे काम चालू आहे ते दाखवून मर्जी मिळविली जाते परंतु आता याबाबत सर्व स्तरावर तक्रारी देऊन सखोल तपासणीची मागणी पंचायत समिती करणार असून दूध का दूध आणि पाणी का पाणी हे लवकरच सिद्ध करून पूर्वी प्रमाणे शासनाने हे दवाखाने चालवावे अशी मागणी करणार आहोत.

महाबळेश्वर तालुक्यातील जनतेसाठी सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय असून कोट्यवधी रु खर्चून सर्व इमारती दुरुस्त करणेत आल्या आहेत,हे रुग्णालयही बेल चालवीत आहे,या ठिकाणी उपलब्ध असणारे बेड,दिली जाणारी सेवा याबाबत ची माहिती डॉ लेले यांनी दिली,शासन मंजूर पॅटर्न प्रमाणे ५ डॉक्टर या ठिकाणी आवश्यक असून फक्त ३ डॉक्टर कार्यरत आहेत,म्हणजे न्या ठिकाणीही मंजूर पॅटर्न प्रमाणे पदे भरलेली नसून मंजूर पदा प्रमाणे अनुदान घेतले जात आहे,या ठिकाणी सर्प दंशसारख्या रुग्णांवर उपचार न करता त्यांना इतरत्र पाठविले जात आहे,अशामुळे या तालुक्यातील २ गरीब रुग्णांचा मृत्यू झाला आहे,त्यांचा लाखो रु खर्च खासगी दवाखान्यात झाला आहे,सध्या कोविड रुग्णांना काहीच सेवा या रुग्णालयात दिली जात नाही त्यांना इतरत्र पाठविले जात आहे,तरी या ठिकाणी सुसज्ज कोविड रुग्णालय करावे व या ठिकाणी कमीत कमी ३५ ते ४० बेड सर्व सोईंनी युक्त असावे याबाबत मा आमदार मकरंद आबा पाटील हे प्रयत्नशील असून याची तयारी ग्रामीण रुग्णालयाने करावी अशी सूचना गायकवाड यांनी दिली,तालुक्यातील कोणत्याही नागरिकास कोविड साठी इतरत्र जावे लागणार नाही व जावे लागलेच तर त्या रुग्णाला संबंधित दवाखान्यात पोहचे पर्यंत सेवा द्यावी अशी सूचना दिली,कोट्यवधी खर्च करून आवश्यक सेवा बेल एअर संस्था पुरवू शकत नसेल व मंजूर पॅटर्न नुसार मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर शासनाने याचा पुनर्विचार करावा या साठी सर्व पदाधिकारी व मा आमदार राज्यस्तरावर भेटणार आहोत असेही मत गायकवाड यांनी मांडले,यावेळी सभेचे सचिव प्रभारी गट विकास अधिकारी सतीश बुद्धे,बाल विकास प्रकल अधिकारी रवींद्र सांगळे व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment