खरं तर 370 कलम हटविल्यानंतर केंद्राने काश्मिरात एखाद्या फिल्मसिटीची योजना राबवायला हवी ; सामनातून भाजपवर पुन्हा एकदा निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी युपीमध्ये देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी उभारणार असल्याचे म्हटल्यानंतर देशात एकच चर्चा सुरू झाली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यानंतर आज 25 सप्टेंबरच्या सामना अग्रलेखातून त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशात सुसज्ज फिल्मसिटी उभारण्याच्या योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर आता शाब्दिक राजकारण रंगले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून यावर भाष्य करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्याची धडपड स्वागतार्ह आहे. मात्र, असे प्रकल्प चालवणे किती अवघड असते, याचाही अभ्यास करणे गरजेचे असते. यापूर्वी मॉरिशस, श्रीलंका, उझबेकिस्तान या देशांनी चित्रपटनिर्मितीसाठी विशेष सवलती देऊ केल्या, रेड कार्पेट अंथरले. मात्र, काही किडुकमिडुक सोडले तर फार कुणी तेथे गेले नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीमुळे मुंबईच्या महत्त्वास कोणतीही बाधा येणार नाही. यापूर्वी मुंबईतून आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र अहमदाबादला गेले. तेव्हाही मुंबईस फरक पडला नाही, असा टोला या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. किंबहुना केंद्र सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर काश्मिरात फिल्मसिटी उभारायला पाहिजे होती, असे शिवसेनेने म्हटले आहे.

खरं तर 370 कलम हटविल्यानंतर केंद्राने काश्मिरात अशा एखाद्या फिल्मसिटीची योजना राबवायला हवी. एकेकाळी आमच्या सिनेजगता चित्रीकरण करण्यासाठी काश्मीर, शिमला, मनाली, शिलाँग अशा भागात जात होते. तेथेही भव्य फिल्मसिटी उभारता येईल.असा खोचक टोला सामनातून मारला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment