परभणी जिल्ह्यात गोदावरी दुथडीभरून ; १ लाख १६ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग चालू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

जायकवाडी धरण ९८% भरल्याने गोदावरी नदीपात्रात करण्यात आलेला पाण्याचा विसर्ग त्यात माजलगाव धरणातुन होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे परभणी जिल्ह्याच्या सीमेवर पाथरी तालूक्यात येणाऱ्या तीन उच्च पातळी बंधाऱ्याचे दरवाजे पूर्ण क्षमतेने उचलत नदीपात्रात १ लाख १६ हजार २०६ क्युसेकने पाणी विसर्ग चालू होता. शनिवारी जायकवाडी धरणा मधून सोडण्यात आलेले पाणी दाखल झाल्यानंतर हा विसर्ग वाढणार आहे.

माजलगाव धरणातून शुक्रवार १८ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वा. ४२ हजार ९०७ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला .त्यात जायकवाडी धरण ९८ %टक्के भरल्याने त्यातून दुपारी ९४ हजार ३२० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात आला आहे . माजलगाव धरणाचे पाणी गोदावरी नदी पात्रात दाखल झाल्याने पाथरी तालुक्यातील तिनही उच्च पातळी बंधाऱ्यांचे दरवाजे पूर्णक्षमतेने उचलत सकाळपासूनच पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.

जिल्हातील तारूगव्हाण उच्च पातळी बंधाऱ्या मधून शुक्रवार १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ .४५ वाजता ११ दरवाजे उचलत ८२ हजार ८७९ क्युसेक ने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. तर त्याखालील मुदगल उच्च पातळी बंधाऱ्यातून दुपारी १ वाजता ११ दरवाजे उचलत ७२ हजार ८o क्युसेक ने विसर्ग चालू होता. अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे विभाग पाथरीचे अभियंता दिवाकर खारकर यांनी दिलीयं. जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेले पाणी शनिवारी सकाळपर्यंत परभणी जिल्ह्यात प्रवेश करणे अपेक्षित असून गोदावरी नदी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळणार आहे. दरम्यान २००६ नंतर २०१६ , २०१९ व यावर्षी गोदावरीचे हे विहंगम दृश्य जिल्हावासियांना पाहायला मिळणार आहे. शुक्रवारी गोदावरीचे हे रूप पाहण्यासाठी जिल्ह्यातील उच्च पातळी बंधाऱ्यावर नागरिकांनी गर्दी केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment