मराठवाडामुक्ती संग्राम लढ्यातुन निर्माण झालेले लढाऊ मुख्यमंत्री : स्वांतत्र्यसैनिक कै.डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। आज 17 संप्टेबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मराठवाड्यासाठी महत्वपुर्ण दिवस……मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात विद्यार्थीदशेत डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे योगदान महत्वपुर्ण राहीले आहे… मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील स्वातंत्रसैनिक पुढे चालुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले….व त्यांनी 17 संप्टेबर हा दिवस महत्वाचा मानुन मराठवाडा मुक्तीदिनानिमीत्त शासकिय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला यांचे कायम स्मरण राहील….. डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची कार्यशैली सामाजीक चळवळीशी कायम बांधील राहीलेली आहे…..हैद्राबाद येथे देश स्वांतत्र्याच्या चळवळीतील नेते येत असत… महात्मा गांधी,पंडीत जवाहरलाल नेहरु,वल्लभाई पटेल,स्वामी रामानंद तिर्थ यासारख्या नेत्यांची भाषने डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी जवळुन ऐकली पाहीली होती…..देशभक्ती व स्वातंत्र्याच्या प्रेरणेतुन निलंगा बिदर, उस्मानाबाद,उदगीर या भागात ही निजाम जुलमी राजवटी विरोधी मराठवाडा मुक्ती संग्राम चळवळ जोर धरली होती… युवकांनी निजामच्या विरोधात आंदोलने केली….अन्याय व अत्याचाराला चिडुन निलंग्यात बाबुराव शेटकार,शेषेराव वाघमारे,मदनलाल,सिद्रामप्पा इ.कार्यकर्त्यांनी चळवळ वाढवण्यात शर्तीचे प्रयत्न केले होते……..तसे आंदोलनात युवकांचा प्रंचड सहभाग दिसुन येत होता…यासाठी युवकांनी निजामाच्या विरोधात पत्रके वाटणे,लोकांना वर्तमानपत्र वाचुन दाखवने,संदेश पोहचवणे,बैठका घेणे इ.कामे करत त्यात डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर हे सक्रिय कार्यकर्ते होते…… इस. 1946साली गुलबर्गा येथे नुतन विद्यालयात डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर मँट्रीकचे शिक्षण घेत होते…..ते सेवादलाचे प्रमुख होते….एके दिवशी रात्री 9 वाजता सायकलीवर पत्रके वाटताना पोलीसांनी पकडले व बडेबाजार पोलीस स्टेशनच्या लाँकअपमध्ये डांबुन ठेवले…संपुर्ण रात्र पोलीस स्टेशनमधेच कोठडीतच काढली….सकाळी पोलीस निरीक्षक महोमद्द गौरी यांच्या समोर उभे केले……पंधरा वर्षाचे शिवाजीराव निर्भीडपणे उभे राहीलेले पाहुन त्यांनी नाव- गाव विचारले….डाँ.निलंगेकरांनी निलंग्याचे नाव सांगताच तो महमद्द गौरीे तिन वर्ष निलंग्यात नोकरी केल्याने त्यांनी सोडले….

परंतु गुलबर्गा परिसरातील ब्रम्हपुर पोलीस स्टेशनला पोस्टर लावताना दुसऱ्यांदा त्यांच्यावरती अटक वाँरट निघाले……शेवटी डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे योगदान चळवळीशी जोडले गेल्याने सर्वसामान्य लोकांशी त्यांची नाळ कायमची अतुट राहीली….. मराठवाड्यातील राजकीय चळवळी हा संशोधनाचा विषय घेवुन त्यांनी पिएचडी प्राप्त केली त्यांनी महाराष्ट्राप्रमाणेच मराठवाड्यावर कायम प्रेम केले विकासात्मक वाटचालीला दिशा दिली ….डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब हे महाराष्ट्राचे देशाचे राहीले त्यांचे सच्चे देशप्रेम प्रेरणादायी आहे….ते नंतरच्या कालावधीत सक्रिय राजकारणात राहुन मराठवाड्याला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला महाराष्ट्राचा अनुशेष भरुन काढण्यासाठी सातत्यपुर्ण प्रयत्न केले……खरे पाहता महाराष्ट्र ही ऐतिहासीक भुमी असुन तिची सामाजीक,राजकीय,आर्थीक आणी वैश्वीक संपन्नतेची पार्श्वभुमी ही भारतमातेसाठी महत्वपुर्ण ठरते.संयुक्त महाराष्ट्र निर्मीतीस 105 हुतात्मे बलीदान गेले तेव्हा कुठे ही छत्रपती शिवरायांची पवित्र भुमी नव्याने उदयास आलीे.या मात्रभुमीचे वर्णन थोर साधु-संतानी काव्यातुन,वचनातुन,साहीत्यातुन गौरवपुर्ण केले आहे.अश्याच रक्तरंजीत बलिदानातुन क्रांती घडलेल्या या मातीने हिमालयाच्या रक्षणासाठी साह्याद्री धावुन गेलेला ऐतिहासीक अनुभव ही दिला.अश्याच बहोत सुंदर, सपंन्न की प्रिय महाराष्ट्राचे नेत्रत्व डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले……दादासाहेबांचे व्यक्तीमत्व अत्यंत प्रभावशाली असुन ते बहुआयामी आहे.त्यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव महाराष्ट्रातील जनसामान्यावर असुन त्यांच्या यशस्वी आयुष्याला वळण देणाऱ्या घटनांचा अभ्यास भावीपिढीसाठी महत्वपुर्ण ठरेल.महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासात दादासाहेबांचा सिहांचा वाटा असुन गांधीवादी तत्वे अंगी बाळगुन सत्य व अहिंसेच्या मार्गांनी काँग्रेस पक्षाशी कायम एकनिष्ठ राहीलेले ते देशातील बलाढ्य नेते होते.महात्मा गांधी म्हणायचे “काँग्रेस पक्ष ही हिऱ्याची खाण असुन महाराष्ट्राच्या मातीने स्व.यशंवतराव चव्हाणासारखे अनेक कोहीनुर हिरे पक्षाला दिले.”या विधानाचा आधार घेवुन त्यापैकी एक कोहीनुर हिरा म्हणजेच डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब होते.

आर्यसमाजी चळवळीत वाढलेल्या दादांना मातोश्री वत्सलाईचा प्रचंड अभिमान वाटत असे… कारण दादासाहेब सहा महिन्यांचे असताना वडिल भाऊराव पाटील यांचे निधन झाले…तेव्हा हा कौटुंबिक धक्का सहन करुन आईंनी दादांना शिक्षण देवुन वाढवले,संस्कारशील सर्वगुण संपन्न बनवले….शिवाजी नावास वागावे हा विचार दिला….स्वातंत्र चळवळीत भाग घेणाऱ्या दादांना प्रोत्साहन देवुन लढण्याचे सामर्थ्य दिले होते….प्रसंगी शेतीत काबाड कष्ट करुन भावाच्या मदतीने आठवडी बाजारात भाजीपाला विकुन दादांच्या शिक्षणांचा खर्च केला….आई दादांना नेहमीच आदरयुक्त स्थानी राहीलेली होती ती याच कारणांमुळे…..दादांसाठी त्यांची आईं हीच खरी प्रेरणा व गुरु राहीलेली होती …..आज 90 व्या वर्षी ही आईच्या आठवनीने दादांना गहीवरतांना महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या लाडक्या नेत्याला पाहीले होते….मातोश्री वत्सलाईचा शब्द दादांसाठी प्रमाण राहीला होता आईविषयी प्रंचड भक्ती असलेले नेते डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर माजी मुख्यमंत्री होते हे नमुद करणे महत्वाचे वाटते.

शालेय जिवनापासुनच दादासाहेबांनी प्रामाणिक देशसेवा केली त्यांचे अनेक किस्से स्वातंत्र्यांचा इतिहास बनुन आहेत व कायम राहतील त्यापैकी……गुलबर्गा येथे नुतन विद्यालयात आठवी वर्गात शिकत असताना शालेय आवारात दादांना पाँकेट सापडले त्यात पन्नास रुपये ही होते.त्यावेळी पन्नास रुपये म्हणजे खुपच मोठी रक्कम होती कारण तेव्हा गरीबी व हालाखीचे दिवस होते…..पन्नास रुपयासंबंधी मित्रांना सांगीतल्यानंतर मित्रांनी सहलीला जायचे व मौज मजा करायचे असे ठरवले परंतु आईचे संस्कार व आर्य समाजी विचारांमुळे दादांना त्यांचे विचार पटले नाहीत त्यांनी लगेच ते पाँकेट मुख्याध्यापक वळसंगकर गुरुजींना दिले. त्यावेळी दादांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांचे कौतुक व सत्कार ही शिक्षकांनी करुन त्यांची सेवादलाच्या प्रमुखपदी निवड ही केली…..खरी तर हीच ती दादांच्या सार्वजनिक राजकीय जिवनाची सुरुवात होती……राजकारणात 60 वर्ष राहुन ही प्रामाणीकपणे देशसेवा करुन दादांनी नेहमीच सत्यांची बाजु घेतली म्हणुन महाराष्ट्राच्या जनतेने ही दादांना भरभरुन प्रेम दिले ….त्यांच्या रोजच्या राजकीय जिवनात प्रलोभने दाखवणारे अनेक माणसे भेटली परंतु दादांनी कधीच अश्या लोकांना भिक घातली नाही उलट काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहुन तत्कालीन पंतप्रधान स्व.इदिंरा गांधी व राजीव गांधी यांच्याशी त्यांनी विश्वासु सबंध प्रस्थापीत करुन महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा फायदा करुन घेतला…….औरंगाबाद हायकोर्ट निर्मिती(खंडपीठ), नविन विधानभवनाची इमारत, लातुर-जालना जिल्हा निर्मिती,महाराष्ट्रातील मोठी धरणे ,शासकिय इमारती निर्माण करुन प्रशासन बळकट केले…..इ.स.1985 ला राजीव गांधी यांच्या उपस्थीतीत काँग्रेस पक्षाचा भव्य शताब्धी सोहळा मुंबई येथे दादांसाहेबांनी पाच लाख लोकांच्या साक्षीने संपन्न करुन दाखविला ….देशविदेशातील आलेल्या लोकांनी दादासाहंबाचे भरभरुन कौतुक केले…..निलंगा विधानसभा आमदार ते मुख्यमंत्री व्हाया महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशी भलीमोठी राजकीय कारकीर्द असुन दादांनी आलेल्या आव्हांनाना,संकटांना लिलया पेलुन गाजवली ….स्व.यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील,बँ.ए.आर.अंतुले,वसंतराव नाईक इ.थोर व्यक्ती दादांसाहेबांचे सहकारी राहीलेले असुन या सर्व नेत्यांच्या वैचारिक विचारांचा प्रभाव महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष वाढीसाठी महत्वपुर्ण ठरत गेला…….त्यामुळेच काँग्रेस पक्ष स्वातंत्र्यानंतर कायम संत्तेत राहीला आहे यात ही दादासाहेबांनी योगदान दिले आहे हे विसरता येणार नाही…..

निर्व्यसनी,नितीसंपन्न,चारित्र्यसंपन्न,अभ्यासु,वाचनप्रीय,असलेले दादासाहेब सर्वधर्म समान मानुन कार्य करतात…..जातीभेदांच्या पलिकडे जावुन ….सामान्य कार्यकर्त्याला जिवापाड जपणारा दादांसारखा नेता क्वचितच आज तरी दिसतोय……..छत्रपती शिवराय व शेतकरी हे दादांच्या कार्याचे केंद्रस्थान असुन शेतकरी टिकला पाहीजे त्यासाठी शेतीला पाणी लागते हे लक्षात घेवुन पाठबंधारे खात्यांचे मंत्री असताना भराभर धरणे ,छोटीमोठी बंधारे बांधुन पावसाचे पाणी आडवुन शेतकऱ्याच्या शेतीला पाणी व मोफत विज उपलब्ध करुन देवुन शेतकऱ्याच्या बाजुनें उभे राहीले..दादासाहेबांनी कर्तत्वाने इतिहास घडवलाय तो इतिहास मांडण्याचे थोडेफार भाग्य लाभतेय इतकेच अनुयायी म्हणुन वाटते.

लेखन: प्रा.शरद रमेशराव सोळंके

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment