महाबळेश्वरमध्ये कायदा व सुव्यवस्थाकरीता ज्याला तडीपार केला त्याने गृहविभागाचे रेकाॅर्ड तपासा : अफजल सुतार यांची कुमार शिंदे वर जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन: महाबळेश्वरमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता गृह विभागाने तडीपार केले होते अशा तडीपारीने सामाजिक कार्याची सुरवात करणार्या नटवरलाल कुमार शिंदे याने आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवावे म्हणजे सुर्यावर थुकण्यासारखे आहे नगरसेवक कुमार शिंदे यांनी आमच्यावर टीका करत असताना महाबळेश्वरच्या पोलिस स्टेशन मध्ये असलेले स्वतःचे क्रीमनल रेकॉर्ड चेक करावे व आपण खरंच या पदास पात्र आहोत का ? अशी जहरी टीका उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी नगरसेवक कुमार शिंदे याच्यावर केली . भ्रष्टाचारात अंखड बुडालेल्या नगराध्यक्षपद व कुमारशिंदे यांच्याकडे मुद्दे नसल्याने गुद्दयाची भाषा कुमार शिंदे करत आहेत अशी जहरी टीका उपनगराध्यक्ष अफजल सुतार यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे .आपल्या पत्नीला नगराध्यक्ष म्हणून देखील आमच्या सर्व नगरसेवकांच्या विनंती वरून व माजी उपनगराध्यक्षा छायाताई शिंदे यांचे कार्य, विचारवंत बंधू समाजसेवक किरण शिंदे यांचे लौकीकामुळे,पुण्याईमुळे सदर पदे प्राप्त झाली असून आपण त्याचा उपभोग घेत आहात. याचा विसर पडू देऊ नका.ज्याला स्वतःचे घर सांभाळता येत नाही त्याने शहर चालविण्याच्या वल्गना करू नयेत. कुमार शिंदे यांना जनता विकासाबाबत जाब विचारत असून त्यांच्याकडे देण्यास कोणतेही उत्तर नाही.त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती ढासळली असून ते वैयक्तीक व खालच्या पातळीवर घसरून टीका करत आहेत.आम्ही फक्त ऑनलाइन मिटिंग न घेता समोरा समोर उपस्थित राहून मिटिंग घेण्याची मागणी केली त्यात गैर काय आहे.

या मीटिंगमध्ये नगराध्यक्ष व त्यांचे पती यांनी नगरपालिकेत केलेल्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल होईल या भीतीनेच नगराध्यक्ष नगरसेवकांच्या समोर येत नाहीत याची कल्पना नागरिकांना आहे.जर नगरसेवकांच्या सोबत मिटिंग घेतल्याने कोरोना होण्याची भीती नगराध्यक्ष व त्यांच्या पतीला वाटत असेल तर पत्रकार परिषद घेतल्याने त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाही का हा प्रश्न आम्हाला सतावत आहे.हिंमत असेल तर सुरक्षेचे सर्व खबरदारी घेऊन वाटलंच तर पती पत्नीने दोघांनीही पीपीई किट परिधान करून मिटींगला उपस्थित रहावे. शहरवासीयांच्या हिताचे निर्णय घेताना नगराध्यक्षांनी नगरसेवकांना आमंत्रित करून मिटिंग घेण्यास काय हरकत आहे ? त्यांना जनतेच्या जीवाची काळजी नाही का ? गेले सात महिन्यापासून नगराध्यक्ष आहेत तरी कोठे ? आम्ही राजकीय टीका केली आहे तर त्याचे उत्तर राजकीय टिकेतूनच येणे अपेक्षित आहे.तुम्ही वैयक्तिक टीका करणार असाल तर आधीच तोंड न दाखविण्याच्या पात्रतेचे असणाऱ्याना येणाऱ्या काळात तोंड लपवून पळावे लागेल.”लाखात एक फलटनची लेक” म्हणत नगराध्यक्षांनी फलटण तालुक्यात जनतेला बनवून दिलेले रोड,आणनेले सिने तारके, दहीहंडी वर केलेला भरमसाठ खर्च महाबळेश्वरच्या जनतेने पहिला असून तो पैसा महाबळेश्वरच्या नागरिकांच्या खिशातून उधळला गेल्याची भावना जनतेची आहे.जर फलटनची लेक फलटण वर इतका खर्च करत असेल तर महाबळेश्वरच्या नागरिकांनी असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे महाबळेश्वरच्या सुनेने आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे ? असा प्रश्न जनता विचारत आहे.स्वतःच्या पुण्याशील, सत्वशील आई,बाप,भाऊ यांच्याशी गद्दारी करून सत्ता हस्तगत करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कोणतेही अनधिकृत काम केले नाही.जे काही कमावले ते कष्टाच्या पैशातून कमावले आहे.आम्ही कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहोत.तुम्ही किरण शिंदे यांनी नगरपालिकेत केलेले अर्ज अजून का अडवून ठेवले आहेत याचे उत्तर द्यावे? अशी कोणती माहिती किरण गोरखनाथ शिंदे यांना दिल्यास ती तुम्हाला त्रासदायक ठरेल याचे उत्तर द्यावे ?

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment