महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत दहशतवाद; देवेंद्र फडणवीसांची बिहारमध्ये जाऊन टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र व्हॉटसएपवर फॉरवर्ड केल्यामुळे कथित शिवसैनिकांकडून शुक्रवारी कांदिवली येथे राहणारे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. ही घटना म्हणजे सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. बिहारचे निवडणूक प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी आज पाटण्यात पत्रकार परिषद झाली यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, व्हॉटसएपवर फॉरवर्ड केल्यामुळे नौदलाचे माजी अधिकारी असलेले मदन शर्मा यांना झालेली मारहाण ही बाब अत्यंत अयोग्य आहे. हा सरकार पुरस्कृत दहशतवादाचा प्रकार आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून तात्काळ गुंडगिरी थांबवण्यास सांगितली. याप्रकरणात ६ आरोपींना अटक झाली. मात्र, अवघ्या १० मिनिटांत त्यांना जामीन मिळाला, असे फडणवीस यांनी म्हटले. त्यामुळे आता सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाबरोबर हा मुद्दाही बिहारच्या निवडणुकीत गाजण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?
शुक्रवारी (11 सप्टेंबर) निवृत्त नौदल अधिकारी असलेले 62 वर्षीय मदन शर्मा यांना काही शिवसैनिकांनी मारहाण केली होती. मदन शर्मा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतच एक व्यंगचित्र व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केलं होतं. याच रागातून काही शिवसैनिक त्यांन्या घरी गेले आणि त्यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मारहाणीची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी भारतीय दंडविधान कलम 325 आणि दंगलीशी संबंधित तरतुदींअंतर्गत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करण्यात आली. परंतु त्यानंतर अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांची जामीनावर सुटका झाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment