लॉकडाऊनमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात लॉकडाउन लागू आहे. त्यामुळं सर्वजण घरात आहेत. अशावेळी वेळ आणि माहिती मिळवण्यासाठी आपल्या स्मार्टफोनचा मोठ्या प्रमाणावर करत आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत काही समाजकंटक खोटी भ्रामक माहिती, फेक मॅसेज व्हायरल करणे, सामाजिक तेढ निर्माण करणारा तपशील सोशल मीडियावर फॉरवर्ड करणे असे प्रकार वाढले आहेत. महाराष्ट्र सायबर सेलने गेल्या २४ तासात अजून ७ गुन्हे नोंदवले आहेत. लॉकडाउनची घोषणा झाल्यापासून आता पर्यंत एकूण १५ लोकांवर सायबर कायदा अंतर्गत गुन्हे दाखल झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर काय बरोबर नको ते मेसेज व्हायरल करणाऱ्यांनीची जणू फौजच तयार झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केले आणि त्या दिवसापासून ते ३ एप्रिल पर्यंत महाराष्ट्र सायबर सेलने सोशल मीडियावर कोरोना व्हायरस संदर्भात खोटे मेसेज तसेच समाजामध्ये तेढ निर्माण करणारे मेसेज व्हायरल करण्यासंदर्भात राज्यभरात ७८ गुन्हे दाखल केले आहेत. तर धक्कादायक बाब म्हणजे २४ तासाच्या आत ७ नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण १५ लोकांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या संधीचा फायदा साधत आर्थिक मदतीचे ही आवाहन करण्यासाठी खोट्या वेबसाईट्स बनवल्या आहेत.

हे सर्व मेसेज स्थानिक लोकांकडूनच बनवण्यात येतात आणि व्हायरल केले जातात. महाराष्ट्र सायबर सेलचे अतिरिक्त पोलिस महासंचालक हरीश बैजल यांनी लोकांना आवाहनन केले की, तुम्ही असे मेसेज वायरल करू नका आणि व्हॉट्सअप ग्रुपचे जर तुम्ही एडमिन असाल तर सेटिंग मध्ये जाऊन फक्त ॲडमिनच मेसेज पाठवू शकेल ते सेटिंग तुम्ही कर जेणेकरून असे खोटे मेसेज वायरल होणार नाही. तसेच तरुणांना देखील आवाहन केले की, तुम्ही असे मेसेज पाठवू नका कारण जर तुमच्यावर गुन्हा नोंदवला गेला तर तुम्हाला भविष्यात सरकारी नोकरी मिळणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

पुण्यात करोनाने घेतला दोघांचा बळी; राज्यातील मृतांचा आकडा वाढला

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

अंडरवर्ल्ड डाॅनची क्वीन’वर नजर; पॅरोलवर सुटताच डॅडी अरुण गवळीचा नवा ‘गेम

उद्धव ठाकरेंनी जिचं कौतुक केलं ‘ती’ आराध्या आहे तरी कोण..

Leave a Comment