शेतकऱ्यांची तुलना आतंकवाद्यांशी ; कंगणाचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून आपल्या सततच्या वादग्रस्त वक्तव्या मुळे चर्चेत असणारी कंगना राणावत आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकू शकते. यापूर्वी मुंबई पोलीसवर शंका उपस्थित करून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने तिला सर्वांच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर कंगणा शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेच्या निशाण्यावर आली. तरीही तिनं आपली वादग्रस्त वक्तव्य कमी केली नाहीत. आता कंगणाने अजून एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. 

कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरुन केंद्रातील सरकारविरुद्ध शेतकरी असं एकंदर चित्र गडद होत आहे. यासाठीच्या आंदोलनांनाही गंभीर वळण प्राप्त होऊ लागलं आहे. असं असतानाच कंगनानं या आंदोलकांची तुलना दहशतवाद्यांशी करत एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ट्विटचा आधार घेत कंगनानं तिची भूमिका स्पष्ट केली. कृषी विधेयकानंतर मोदींनी शेतकऱ्यांना उद्देशून एक ट्विट केलं. ज्यामध्ये त्यांनी आपलं सकरार हे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असल्याची बाब स्पष्ट केली. एमएसपीची व्यवस्था यापुढेही सुरु राहिल. शेतमालाची खरेदी सरकार करणार आहे. आम्ही इथं शेतकऱ्यांच्या सेवेसाठीच आहोत. अन्नदाता असणाऱ्या बळीराज्याच्या सेवेसाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या भावी पिढीसाठी समृद्ध जीवनाची शाश्वतीही देणार आहोत’, असं मोदींनी ट्विट करत लिहिलं. 

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, जो झोपी गेला आहे त्याला जागवता येऊ शकतं. ज्याला गैरसमज आहेत ते दूरही करता येऊ शकतात, त्यांची समजूत काढता येऊ शकते. पण, झोपण्याचं आणि काहीही न समजल्याचा अभिनय कोणी करत असेल तर तसं सोंग कोणी घेत असेल त्यांना समजावण्यामुळं काय फरक पडणार आहे? CAA ला विरोध करणारे हे तेच दहशतवादी आहेत. CAA विरोधातील आंदोलनात रक्ताचे पाट वाहिले. पण, या कायद्यामुळं एकाही व्यक्तीचं नागरिकत्व हिरावलं गेलं नाही’, असं कंगनानं तिच्या ट्विटमध्ये लिहिलं. 

कंगनाच्या या ट्विटवर अनेक लगेचच अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. केंद्राच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या काँग्रेसकडूनही यायवर संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली. महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत लिहिलं, ‘आता कंगना राणौत शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणाली. मोदी सरकार आणि भाजपच्या  नेत्यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment