ICICI बँकेच्या CEO चंदा कोचर यांच्या ‘या’ एका चुकीमुळे उध्वस्त झाले त्यांचे संपूर्ण करिअर, त्याविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ते म्हणतात ना की माणसाची मेहनत त्याला खूप उंचावर घेऊन जाते, मात्र एक छोटीशी चूकही त्याला एका झटक्यात खाली आणते. असेच काहीसे आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) चंदा कोचर (Chanda Kochhar) यांच्या बाबतीत घडले. चला तर मग प्रशिक्षणार्थी (Trainee) ते आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात…

अशा झाली आयुष्याची सुरुवात
चंदा कोचर हे एक असे नाव आहे ज्याने केवळ भारतीय बँकिंग क्षेत्रातील पुरुषांचे वर्चस्वच मोडले नाही, तर जगभरातील बँकिंग क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. राजस्थानच्या जोधपूर येथे एका सिंधी कुटुंबात जन्मलेल्या कोचर चांगल्या शैक्षणिक वातावरणात वाढल्या. त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाकडून कॉस्ट अकाउंटन्सी केली आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठातून मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली.

अशाप्रकारे, यशाची शिडी चढल्या
त्यानंतर 1984 मध्ये चंदा कोचर या म्हणून आयसीआयसीआय मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी रुजू झाल्या. 1994 मध्ये जेव्हा आयसीआयसीआय संपूर्ण मालकीची बँकिंग कंपनी बनली, तेव्हा चंदा कोचर यांना असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून नियुक्त केले गेले. यानंतर चंदा कोचर यशाच्या पायर्‍या चढतच राहिल्या. 2001 मध्ये बँकेने त्यांना डेप्युटी जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर या पदावर एक्सिक्युटिव्ह डायरेक्टर केले. यानंतर त्यांच्यावर कॉर्पोरेट व्यवसायाकडे लक्ष देण्याची जबाबदारी सोपविली गेली. त्यानंतर त्यांना चीफ़ फायनान्शिअल ऑफ़िसर करण्यात आले.

भारत सरकारने पद्मभूषण बहाल केले
2009 मध्ये चंदा कोचर यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एमडी केले गेले. चंदा कोचर यांच्या नेतृत्वात आयसीआयसीआय बँकेने रिटेल व्यवसायामध्ये पाऊल ठेवले, ज्यामध्ये त्यांना अपार यश मिळाले. त्यांची योग्यता आणि बँकिंग क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची साक्ष ही आहे की, भारत सरकारने चंदा कोचर यांना त्यांचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण (2011 मध्ये) देऊन सन्मानित केले.

आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
हळू हळू प्रगती करत त्या आयसीआयसीआय बँक (ICICI BANK) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बनल्या. फोर्ब्स मासिकाच्या जगातील सर्वात ताकदवान महिलांच्या यादीत समाविष्ट झालेल्या चंदा कोचर यांनी कर्ज वादाच्या प्रकरणात राजीनामा देऊन सर्वांना चकित केले. बँकेची कर्ज देणारी कंपनी व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजने कोचर यांच्या पतीच्या कंपनीत गुंतवणूक केल्याच्या गैरव्यवहाराच्या आरोपा नंतर चंदा कोचर यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये राजीनामा दिला होता.

यामुळे दिला राजीनामा
मार्च 2018 मध्ये चंदा कोचर यांच्यावर त्यांच्या पतीला आर्थिक लाभ देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला गेला होता. मीडिया रिपोर्टनुसार आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन ग्रुपला 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. व्हिडिओकॉन समूहाने या कर्जाचे 86 टक्के (सुमारे 2810 कोटी रुपये) परतफेड केलेले नाहीत. 2017 मध्ये हे कर्ज NPA (नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट) मध्ये ठेवले गेले.

कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्याशी व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांचे व्यावसायिक संबंध असल्याचे एका बातमीत समोर आले होते. व्हिडीओकॉन समूहाच्या मदतीने स्थापन झालेल्या कंपनीचे नाव नंतर चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या नेतृत्वात पिनाकल एनर्जी ट्रस्ट असे करण्यात आले. दीपक कोचर यांच्या सह-मालकीच्या त्याच कंपनीच्या माध्यमातून धूतने कर्जाचा मोठा हिस्सा ट्रान्सफर केल्याचा आरोप करण्यात आला. 94.99 टक्के होल्डिंगअसलेल्या या शेअर्सची केवळ 9 लाख रुपयांत ट्रांसफ़र केल्याचा आरोप झाला होता.

78 कोटींची मालमत्ता कुर्क केली
बँकेने सुरुवातीला घाईघाईने कोचर यांच्याविरूद्ध खटला उधळण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर लोकं आणि नियामक यांच्या सतत दबावामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. आयसीआयसीआय बँकेने स्वतंत्र चौकशी करण्याचे ठरविले. बँकेने 30 मे 2018 रोजी जाहीर केले की, व्हिसल ब्लोअरच्या आरोपाची सखोल चौकशी बोर्ड करेल. त्यानंतर या प्रकरणात स्वतंत्र चौकशीची जबाबदारी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश बी.एन. श्रीकृष्ण यांच्यावर सोपविली गेली. जानेवारी 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा तपास पूर्ण झाला आणि त्यामध्ये चंदा कोचर या दोषी असल्याचे आढळले. या वर्षाच्या सुरूवातीला ईडीने चंदा कोचर, दीपक कोचर आणि त्यांच्या मालकीच्या आणि नियंत्रित कंपन्यांशी संबंधित 78 कोटींची मालमत्ता कुर्क केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment