आपली जी काय राजकीय लढाई आहे ती पाकिस्तानच्या नावाशिवाय लढ गं बाई! कंगनाला सल्ला

वृत्तसंस्था । मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर असा केल्यानंतर कंगनाविरोधात राज्यभरात वातावरण तयार झाले. कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्याने राजकीय, कला क्षेत्रातून तिला विरोधाचा सामना करावा लागला. याशिवाय राजकीय खडाजंगीही झाल्या. त्यानंतर कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोडल्यानंतर कंगनाने महाराष्ट्राला आता थेट पाकिस्तान असे म्हणत कारवाईचे फोटो ट्विट केले. त्यामुळे कंगनाविरोधातील रोषात आणखीच भर पडली. यावर पाकिस्तानची पत्रकार मेहरने ट्विट करत कंगनाला मोलाचा सल्ला दिला.

मुंबईला आधी पाकव्याप्त काश्मीर आणि मुंबई महापालिकेच्या कारवाईनंतर पाकिस्तान असे संबोधणाऱ्या कंगनावर नेटिझन टीका असताना आता पाकिस्तानमधूनही कंगनाला सल्ला देण्यात आला आहे. कंगनाने आपली राजकीय अथवा इतर मुद्यावरील लढाई ही पाकिस्तानच्या नावाशिवाय लढायला हवी असे ट्विट करत मेहरने कंगनाला सल्ला दिला.

स्वाभाविकपणे मेहरच्या ट्विटनंतर काही कंगनाच्या कडव्या समर्थकांनी मेहरला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो त्यामुळे पाकिस्तानचे नाव का घेऊ नये असेही अनेकांनी म्हटले. याआधीदेखील मेहरने अभिनेत्री रिया चक्रवर्तीलाही पाठिंबा दर्शवला होता. रिया चक्रवर्तीविरोधात मीडिया ट्रायल सुरू असून मीडिया लिचिंग होत असल्याचा आरोप मेहेरने केला होता. रियाची मानसिक स्थिती काय असेल याची कल्पना असल्याचेही तिने म्हटले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook