सलाम! मुंबई पोलिसांना, प्रसंगावधान दाखवत वाचविले आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे प्राण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबई पोलिसांनी प्रसंगावधान राखून एका तरुणीचे प्राण वाचविले. आत्महत्या करण्यासाठी टेरेसवरील पाण्याच्या टाकीवर चढलेल्या या २० वर्षीय तरुणीचे पोलिसांनी मोठ्या हुशारीने तिचा जीव वाचवला. अंधेरीमधील कोलडोंगरी परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. तरुणीला आत्महत्येपासून प्ररावृत्त करणाऱ्या पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीमधील कोलडोंगरी मध्ये राहणारी २० वर्षी तरुणी महाविद्यालयात शिकते. घरगुती कारणावरून तिचे कुटुंबियांशी भांडण झाले आणि या रागातून सरिता आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीवर जाऊन बसली. दरम्यान, दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळाली.

त्यानंतर अंधेरी पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रवीण जाधव, भिंगर्दीवे, थिटे आणि सोनिया साळवी हे घटनास्थळी तात्काळ पोहोचले. प्रवीण जाधव यांनी त्या तरुणीला बोलण्यात गुंतवून ठेवत तिच्या जवळ पोहोचले आणि संधी मिळताच तिला कठड्यावरून आत खेचले. पोलिसांनी दाखविलेला संयम आणि प्रसंगावधान यामुळे त्या तरुणीचे प्राण वाचले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment