बाबरी मशीद विध्वंस प्रकरण: कोर्टाच्या निकालानंतर काँग्रेसनं जनतेची माफी मागायला हवी- योगी आदित्यनाथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेचे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियारसह सर्व 32 आरोपींना साक्षीअभावी निर्दोष ठरवले आहे. न्यायालयानं बाबरी मशीद पाडण्याचा कट पूर्वनियोजित नव्हता, असं सांगत या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या निर्णयाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केले असून, या षडयंत्रासाठी काँग्रेसनं जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

निकालानंतर योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून आनंद व्यक्त करत म्हणाले, “सत्यमेव जयते! सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत. तत्कालीन काँग्रेस सरकारनं राजकीय पूर्वग्रह दूषितपणातून संत, भाजपाच्या नेत्यांवर, विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर, समाजसेवकांना खोट्या गुन्हा फसवून बदनाम करणयात आलं. या षडयंत्रासाठी काँग्रेसनं जनतेची माफी मागायला हवी,” अशी मागणी योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

१९९२ मध्ये  काढण्यात आलेल्या रथयात्रेनंतर ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली होती. या प्रकरणात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसह ३२ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. १९९२पासून सुरू असलेल्या या खटल्यात विशेष सीबीआय न्यायालयानं आज निकाल दिला. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असं निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवलं. तसंच आरोपींविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचं सांगत या खटल्यातील ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment