बिहार निवडणुक निकालांवरून फडणवीसांना शरद पवारांचा टोला, म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रभारी म्हणून काम पाहिलं. बिहारमधील भाजपच्या यशात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याची प्रतिक्रिया विदर्भातील भाजप नेते चंद्रशेखर बानवकुळे यांनी दिली आहे. त्याबाबत शरद पवार यांना पत्रकारांनी विचारलं असता, “हो का? हा चमत्कार आपल्याला माहिती नव्हता. फार चांगली गोष्ट सांगितली तुम्ही” अशा शब्दात पवारांनी फडणवीसांची खिल्ली उडवली.
तर दुसरीकडे बिहार भाजपच्या संभावित यशाचे श्रेय बिहार निवडणुकीचे भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना दिले जात आहे. फडणवीसांनी बिहारच्या प्रचाराची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळली त्यामुळे भाजपला घवघवीत यश मिळत असल्याचे भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे.

नेमकं काय म्हणाले होते बावनकुळे?
बिहारमध्ये भाजपने मोठं संघटन उभारलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक प्रभारी म्हणून ज्या प्रकारे प्रचाराची धुरा सांभाळली त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.“बिहार निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपनं संघटन उभारलं आणि पाच वर्षांत जे काम झालं. त्याचा परिणाम निकालावर झालेला दिसतो आहे.

एनडीएला जनतेने भरभरून मते दिली आहेत. त्यामुळेच बिहारमध्ये एनडीएची सत्ता पुन्हा येणार असल्याचं दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने बिहारमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसून येत आहे.” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment