Mumbai Power Cut: सरकारचं सर्किट ठिकाण्यावर आहे का? आशिष शेलारांचा सरकारला करंट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बत्ती गुल झाली. मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. सोमवारी सकाळी सव्वा 10 वाजताच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. ”मुंबईत वीज गायब झाली. ही नियोजन शून्यता असून या सरकारचं सर्किट ठिकाण्यावर आहे का?, असा सवाल करतानाच या नियोजन शून्यतेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याला निलंबित करा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.” (ashish shelar slams maharashtra government over power failure)

मुंबईत अचानक वीज पुरवठा का जातो. या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? कुठे आहे वीज मंत्री? मुख्यमंत्री आता जनतेशी का बोलत नाहीत?, असे सवाल करतानाच मुंबईकरांवर बेततं तेव्हा गायब होणारी ही मंडळी आहेत, अशी टीका शेलार यांनी केली. केवळ नियोजन शून्यतेमुळे विद्यार्थी आणि रुग्णांची दुरावस्था होत आहे. चाकरमानी लोकलमध्ये अडकले आहेत. हा केवळ नियोजन शून्यतेचा परिणाम आहे. या नियोजन शून्यतेला जबाबदार असलेल्या तात्काळ निलंबित करा, अशी मागणी त्यांनी केली.

वीज पुरवठा खंडित होऊ शकतो याची पूर्व कल्पना सरकारला नव्हती का?, असा सवाल करतानाच वीज पुरवठा खंडित झाल्याने कुणाला दगा फटका झाला तर त्याचं पाप या सरकारवर असेल, असंही ते म्हणाले. एक तासात वीज पुरवठा सुरळीत करणार असल्याचं ऊर्जा मंत्री नितीन राऊत सांगत आहेत. वीज पुरवठा सुरळीत होईल म्हणजे तुम्ही उपकार करत नाही? आधी तासभर वीज गेलीच कशी याचं उत्तर मुंबईकरांना द्या, असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment