‘मी नाही बाप काढला, मी सहज बोललो होतो, त्यावर इतकं अंगावर येऊ नका हो!’; चंद्रकांतदादांची सारवासारव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Bjp Chandrakant Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना ”आम्ही तुमचे बाप आहोत” असे म्हणाले होते. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी “चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढण्याची भाषा सारखी करत आहात” असा प्रतिहल्ला चढवला होता. यानंतर आता ‘बाप’ हा सहज वापरला जाणारा शब्द असून कुणाचाही ‘बाप’ काढला नाही असं पाटील यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी “बापाची पेंड हा सहजपणे वापरला जाणारा शब्द आहे. त्या शब्दाचा मी वापर केला. त्यातून कुणाचाही बाप काढायचा नव्हता,” अशी सारवासारव केली आहे. तसेच हा सहज वापरलेला शब्द आहे. हे यांना कळत नाही का? त्यावरून अंगावर येण्याची गरजच काय? असं देखील म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (15 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच आपल्या विधानावरही त्यांनी खुलासा केला आहे.

कुणाचाही बाप काढायचा माझा हेतू नव्हता
”मराठीत अनेक शब्द सहजपणे वापरले जातात. त्यापैकी बाप हा सुद्धा एक शब्द आहे. तुमच्या बापाची पेंड आहे का? असं आपण सहज म्हणतो. पुणे प्रभाग समितीच्या निवडणुकीच्या संदर्भानं आम्हीही बाप आहोत असं मी म्हणालो. त्यातून कुणाचाही बाप काढायचा नव्हता. तसा माझा हेतूही नव्हता. अजित पवारांचाही बाप काढलेला नाही. हा सहज वापरलेला शब्द आहे. हे यांना कळत नाही का? त्यावरून अंगावर येण्याची गरजच काय?” असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment