Arnab Goswami: ५ ते ६ कोटींसाठी आईसह कुणी आत्महत्या करतं का? अन्वय नाईक प्रकरणात निलेश राणेंचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी बुधवारी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली. त्यानंतर राज्यासह देशभरात भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन केले. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यातही ठिकठिकाणी आंदोलन केले. महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

दरम्यान “मुंबईतील प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांनी आत्महत्या का केली?, याचं सत्य नक्की बाहेर पडेल,” अशी प्रतिक्रिया भाजप नेते निलेश राणे यांनी दिली आहे. याशिवाय “तब्बल 300 कोटींचा मालक 5 ते 6 कोटींसाठी आईबरोबर आत्महत्या करतो, हे मला पटत नाही, यात काही वेगळंही कारण असू शकतं असा दावा करत य प्रकरणी उत्तरं महाराष्ट्राला मिळायला हवीत,” असेही निलेश राणे म्हणाले.

“अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली हे पटत नव्हतं. म्हणून अलिबागमध्ये स्थानिकांकडून माहिती काढल्यानंतर असं कळलं की त्यांची परिस्थिती इतकी वाईट नव्हती. त्यांनी आत्महत्या केली त्याचं कारण पैसे होऊ शकत नाही, ती आत्महत्या नाही, असं अलिबागमधील काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे सत्य बाहेर पडेलंच,” असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे. यावरुन त्यांनी महाविकासआघाडीच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment