निलेश राणेंनी ‘ते’ ट्विट डिलीट करण्यामागे सांगितलं ‘हे’ कारण..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । काल माजी खासदार निलेश राणे यांनी उदयनराजे यांच्याविषयी प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या विधानाबाबत ट्‌विट केले होते. पण, त्यांनी ते ट्विट डिलीट केले होते. त्यानंतर आता ते ट्‌विट का डिलिट करण्यामागचे स्पष्टीकरण निलेश राणे यांनी दिलं आहे. ”घाबरलो तर आयुष्यात कोणाला नाही मी! पण वैतागून कालचं माझं ट्विट डिलिट केलं कारण इतरांना काहीच घेणं देणं नाही राहीलं, असं त्यांनी सांगितलं.

”माजी खासदार आणि वंचित पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांच्या बद्दल अपशब्द वापरला होता. त्यांना त्यांनी बिनडोक म्हटले होते. त्यामुळे आंबेडकरांविषयी नाराजीचा सूर होता. उदयनराजे यांना जो अपशब्द वापरला आणि महाराष्ट्राने तो सहन केला ह्या गोष्टीचं खरंच आश्‍चर्य वाटलं असे राणे म्हणाले.

”घाबरलो तर आयुष्यात कोणाला नाही मी, पण वैतागून कालचं माझं ट्विट डिलिट केलं कारण इतरांना काहीच घेणं देणं नाही राहीलं” म्हणत निलेश राणे यांनी खंत व्यक्त केली. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार बेपर्वा आहेत असे संभाजीराजे म्हणाले. राज्य सरकारमध्ये मराठा नेते असून सुद्धा मूग गिळून गप्प आहेत. कोण वंशजांचे पुरावे मागतात… कोण राजेंचा अपमान करतात… महाराष्ट्रात ही लाजिरवाणी बाब आहे असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment