भाजपला लागली ‘भरती’नंतरची ओहोटी? खडसेंनंतर पंकजा मुंडे शिवसेनेत येणार, शिवसेना नेत्याचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यांनतर भाजपच्या ओहोटीला जणू काही सुरुवात लागल्याचं वातावरण तयार झाल्याचे दिसत आहेत. नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, असं शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले आहेत.

“मागच्या 5 वर्षांमध्ये भाजपने जी काही भरती आली होती, ती आता ओसरायला लागलीये. नाथाभाऊंसारखा ज्येष्ठ नेता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतोय हा भाजपला मोठा धक्का आहे. भाजपचे आणखीही बरेचसे नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. ते देखील येत्या काळात त्यांच्या बुद्धीप्रमाणे निर्णय घेतील”, असा दावा खोतकर यांनी केला.

एकनाथ खडसे हे भाजप सोडून गेल्यानंतर पंकजा मुंडे यांच्यावर भाजपात अन्याय होईल का? यावर बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले, “शिवसेनेची दारं सगळ्यांसाठी उघडी आहेत. पंकजा ताईच काय राज्यातला कुणीही नेता ज्याला सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी काम करायचंय, अशा नेत्यांना शिवसेनेची दारं उघडी आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करु”.

खडसेंच्या राजीनाम्यावरुन मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला कोपरखळी लगावली आहे. यशाची शिखरं पादाक्रांत करत असताना पायाची दगडं का निसटत आहेत, याचा विचार भाजपनं करावा, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment