‘वडेट्टीवार तर खाजगीत OBCमध्ये मराठा समाजाला घ्या असं म्हणतात’; संभाजीराजेंचा खळबळजनक दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. अशा वेळी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. ‘मंत्री विजय वडेट्टीवार बाहेर वेगळी भूमिका घेतात आणि खासगीत वेगळी. वडेट्टीवार खाजगीत ओबीसीत मराठा समाजाला घ्या म्हणतात. त्यांचा आरक्षणावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे’, असं खळबळजनक दावा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

”वडेट्टीवार यांच्यामुळे मी फार दुःखी आहे. ओबीसी मधून आरक्षण नको हे मी अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे. वडेट्टीवार मला म्हणाले होते की ओबीसी मधून आरक्षण देण्यास तयार आहे. मी म्हणालो कृपया असे करू नका. वडेट्टीवार असं का वागत आहेत माहिती नाही,” असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला
खासदार संभाजीराजे म्हणाले की, मी कधीही तलवार काढू असे म्हटले नाही. समाजातील लोक आक्रमक होते, आम्ही तलवार काढलीय, तुम्ही आदेश द्या म्हणत होते, मी म्हणालो तुम्ही काही करू नका, गरज पडली तर मी आहे. समाजाला शांत करण्यासाठी मी तसं बोललो, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे. सारथी विषयी आणि माझ्याविषयी वडेट्टीवारांना आकस आहे. तोच पुन्हा बाहेर येतोय. महाराष्ट्रात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सूरू आहे. त्यात सत्ताधारी पक्षातली काही मंडळी आहेत. माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला. वडेट्टीवार मला एक बोलले आणि आता दुसरं बोलतायत, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. त्यांनी असं करू नये, त्यांनी माझं संपूर्ण भाषण ऐकावं, असं संभाजीराजे म्हणाले.

तर मला छत्रपतींचा वंशज म्हणवण्याचा अधिकार नाही
ते म्हणाले की, एमपीएससी परीक्षेच्या बाबतीत माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. ते सकारात्मक निर्णय घेतील, तरीही परीक्षा झाल्या तर सकल मराठा समाज जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे. जर बहुजन समाजाबद्दल माझ्या मनात काही असेल तर मला छत्रपती घराण्याचा वंशज म्हणवण्याचा अधिकार नाही, असंही संभाजीराजे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment