‘TRPसाठी नुसतेच ओरडून काही होत नाही, त्यासाठी..’ ‘बिग बॉस’च्या मंचावरून सलमानचा अर्नबला टोला

मुंबई । बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस’चे 14वे पर्व सध्या टीव्हीवर गाजते आहे. नुकताच ‘बिग बॉस’च्या घरात ‘विकेंड का वार’ पार पडला. यादिवशी सलमान खान (Salman Khan) घरातल्यांना त्यांच्या चुकांबद्दल चांगलेच खडसावत असतो. यंदाच्या पहिल्या ‘विकेंड का वार’मध्ये सलमान मस्तीच्या मूडमध्ये दिसला होता. परंतु, तरीही त्याने नव्या स्पर्धकांना जोशाने खेळण्याचा सल्ला दिला होता. त्याच्या मते या घरात अद्याप सगळेच शांत आहेत. स्पर्धकांनी खेळ उत्साहाने खेळला पाहिजे. हे सांगत असतानाच त्याने, ‘टीआरपीसाठी (TRP Controversy) नुसतेच ओरडून काही होत नाही’, असे म्हणत अप्रत्यक्षरित्या अर्णब गोस्वामीला टोला लगावला आहे.

सलमान खान (Salman Khan) त्याच्या बेधडक बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बरेच मोठे कलाकार गप्प राहिल्याने, त्यांच्या ‘चुप्पी’वर प्रश्नचिन्ह लावण्यात आले होते. या वादात सलमान खानला गोवण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. यासगळ्यावरही मौन राहणेच सलमानने पसंत केले होते. मात्र, आता त्याने टीआरपीचा मुद्दा (TRP Controversy) अधोरेखित करत, खोचक शब्दांत या सर्वांना टोला लगावला आहे. (Salman Khan Breaks the silence on TRP controversy at Bigg Boss House)

टीआरपी सर्वांनाच हवा असतो, पण…
या सगळ्या दरम्यान सलमानने सुशांत प्रकरणात आपले नाव पुढे करणाऱ्या सगळ्यांनाच टोला लगावला आहे. ‘आपले चित्रपट कोण बघतात? आपली जनता. टीआरपी आपल्या सगळ्यानांच हवाय परंतु, त्यासाठी काही वाटेल ते करू नये. खोट्या बातम्या पसरवून, ओरडून नाही तर, सत्याची बाजू घेऊन, निष्ठावान बनून आपल्याला मोठे व्हायचे आहे. असे केल्यानेच तुम्ही कायम लोकांच्या लक्षात राहाल. मला जे काही सांगायचे होते, ते मी अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे’, असे सलमान म्हणाला. सलमान खानचा हाच अंदाज त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो. (Salman Khan Breaks the silence on TRP controversy at Bigg Boss House)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com