शेतकऱ्यांसाठीची फडणवीस सरकारची ‘ही’ योजना फेल गेल्याचं सांगत राज्य सरकारनं केली रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी फडणवीस सरकारने आणलेली ‘बळीराजा चेतना योजना’ वर्तमान उद्धव ठाकरे सरकारने बंद केली आहे. मागच्या ही योजना २०१६ मध्ये जाहीर झाली होती. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात ही योजना अपयशी ठरल्याने २०१५ मध्ये जाहीर करण्यात आलेली ही योजना बंद करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने यासंदर्भातले आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी सरकारने या योजनेचा आढावा घेतला. उस्मानाबाद आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये कोणतीही घट झाली नसल्याचं स्पष्ट झालं. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार २००१ ते २०१९ या कालावधीत महाराष्ट्रात ३२ हजार ६०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जेव्हा भाजपा-शिवसेना महायुतीचं सरकार होतं त्या कालावधीत २०१५ ते २०१८ या कालावधीत १४ हजार ९८९ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. दरम्यान, ‘बळीराजा चेतना योजना’ अपयशी ठरल्याचे सांगत ठाकरे सरकारने ही योजना बंद केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर भाजपाची काही प्रतिक्रिया येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बळीराजा चेतना योजना
राज्यातील शेतकऱ्यांच्या कळण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या दृष्टीनं ‘बळीराजा चेतना योजना’ २०१६ मध्ये फडणवीस सरकारने अमलात आणली होती. या योजनेअंतर्गत व्यथित शेतकऱ्यांना शोधणे, शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी सामूहिक विवाह आयोजित करणे अशा तरतुदी होत्या. याशिवाय शेतकऱ्यांचे उत्तम आरोग्य सेवा पुरवणे, कर्जाचे पुनर्गठन करुन देणे यांचीही तरतूद होती.

अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य, महसूल, अर्थ खाते, जलसंपदा, महिला आणि बाल कल्याण विभागांच्या योजनांचे विलीनीकरण करण्यात यावे असाही प्रस्ताव फडणवीस सरकारने मांडला होता. सुरुवातीला ही योजना मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि विदर्भातील यवतमाळ या ठिकाणी अनुक्रमे ४८.९ कोटी आणि ४५.७ कोटींच्या तरतुदींसह सुरु करण्यात आली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment