अहमद पटेलांच्या निधनाने काँग्रेसने ‘चाणक्य’ गमावला; महाविकास आघाडीच्या स्थापनेत मोठी भूमिका- उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । काँग्रेसचे ‘चाणाक्य’ म्हणून ओळखले जाणारे दिग्गज नेते अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. देशातील विविध नेते त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मार्गदर्शक हरपला, अशा शब्दात अहमद पटेल यांना आदरांजली वाहिली.

अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे चाणक्य समजले जात. पक्षाला प्रत्येक प्रसंगात त्यांचा आधार होता. केवळ राजकीय आघाडीवरच ते सक्रीय होते असे नव्हे तर अनेक सामाजिक कार्यांशी त्यांचा जवळून संबंध होता. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची देखील मोठी भूमिका होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला, असेही मुख्यमंत्री पटेल यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले. त्यांच्या निधनाने काँग्रेस तसेच महाविकास आघाडीने देखील आपला मार्गदर्शक गमावला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. (Cm Uddhav Thackeray Tribute Ahmed Patel)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment