भाजपची बॉलिवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार; अशोक चव्हाणांचे टीकास्त्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबईतील बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलविण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यावरुन राजकारण रंगत असताना नुकतंच त्यावर अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. “भाजपच्या 5 वर्षाच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आली. आता महाराष्ट्रातील सरकार बदलले तर उत्तरप्रदेश सरकारच्या नावाखाली बॉलिवूडचे (Bollywood Industry in UP) लचके तोडण्याची पटकथा तयार झालेली दिसते,” अशी खोचक टीका काँग्रेस नेते अशोक चव्हाण .(Ashok Chavan) यांनी दिली. पण भाजपच्या काळात जे झाले ते आम्ही पुन्हा घडू देणार नाही, असा इशाराही अशोक चव्हाण यांनी दिला.

“मागील 5 वर्ष नियोजनबद्ध पद्धतीने महाराष्ट्राचे आर्थिक आणि औद्योगिक महत्व कमी केले जात असताना भाजपचे तत्कालीन राज्य सरकार अन् नेते गप्प होते. सरकार गेल्यानंतरही वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी त्यांनी कोरोनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी पीएम केअर्सला पैसे देण्यासाठी पुढाकार घेतला,” असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला.

“देशातील सर्व राज्यांची प्रगती झाली पाहिजे आणि त्यासाठी केंद्र व सर्व राज्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, याबाबत दूमत नाही. पण ताकदीच्या बळावर दुसऱ्याच्या ताटातील घास हिसकावून पोट भरणे योग्य नाही. या पापात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी सहभागी होऊन महाराष्ट्राशी द्रोह करू नये,” असा सल्ला अशोक चव्हाणांनी दिला. (Ashok Chavan on Parallel Bollywood Industry in UP)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment