‘लॉकडाउन कामगारांसाठी मृत्यूदंडासारखाचं सिद्ध झाला’; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊन करताना २१ दिवसांच्या काळात करोनाला नष्ट करू असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. मात्र, आधी २१ दिवस आणि नंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं लॉकडाउन वाढवावा लागला. त्याचा विपरित परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आणि लॉकडाउन शिथिल कार्यात आला. दरम्यान, देशात अजूनही कोरोना प्रादुर्भाव कायम असून आधी पेक्षा परिस्थिती गंभीर आहे. अशा वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना त्या २१ दिवसांच्या वाचनाची आठवण कारण देत निशाणा साधला आहे. “अचानक करण्यात आलेला लॉकडाउन कामगारांसाठी मृत्यूदंडासारखाच सिद्ध झाला,”अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी ‘अर्थव्यवस्था की बात’ कार्यक्रमातून मोदी सरकारनं घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयावर टीका केली आहे. “अचानक लागू करण्यात आलेला लॉकडाउन असंघटित क्षेत्रासाठी मृत्यूदंडासारखाच सिद्ध झाला. वचन दिलं होत २१ दिवसांत कोरोना संपवण्याचं, पण संपवण्यात आले कोट्यवधी रोजगार आणि छोटे उद्योग,” असं म्हणत राहुल गांधी यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी व्हिडीओत?
“कोरोनाच्या नावावर जे केलं, ते असंघटित क्षेत्रावरील तिसरं आक्रमण होतं. सुक्ष्म आणि मध्यम उद्योग चालवणारे लोक रोज कमवतात आणि खातात. जेव्हा कोणतीही सूचना न देता लॉकडाउन केलं, तेव्हा ते यांच्यावरील आक्रमण होतं. पंतप्रधानांनी सांगितलं की २१ दिवसांची लढाई असेल, पण असंघटित क्षेत्राचा मणकाच २१ दिवसात तुटला. लॉकडाउननंतर तो उठवण्याची वेळ आली. या काळात काँग्रेस एक नाही, तर अनेक वेळा सांगितलं की, गरिबांची मदत करावीच लागेल. न्याय योजनेसारखी एक योजना लागू करावी लागेल. थेट बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील. पण नाही केलं.

काँग्रेस सांगितलं की, सुक्ष्म आणि लघू उद्योगांसाठी पॅकेज तयार करा. त्यांना वाचवण्याची गरज आहे. या पैशाशिवाय हे उद्योग नाही जगणार. सरकारनं काहीच केलं नाही. उलट सरकारनं सर्वात श्रीमंत लोकांचा लाखो करोडो रुपयांचा टॅक्स भरला. लॉकडाउन करोनावर आक्रमण नव्हतं. लॉकडाउन देशातील गरिबांवरील आक्रमण होतं. युवकांच्या भविष्यावर आक्रमण होतं. लॉकडाउन मजूर, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांवर आक्रमण होतं. आपल्या असंघटित अर्थव्यवस्थेवर आक्रमण होतं. आपल्याला हे आक्रमण समजून घ्यावं लागेल. या आक्रमणाविरोधात उभ राहावं लागेल,” असं आवाहन राहुल गांधी यांनी देशवासियांना केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment