अजित पवारांनी केली कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाली सुट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अजित पवार यांना 26 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आठवडाभर उपचार घेतल्यानंतर आज ते कोरोनातून बरे होऊन घरी परतले. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून त्यांना आजच (2 नोव्हेंबर) डिस्चार्ज मिळाला. अजित पवार आठवडाभर घरातच विश्रांती करणार आहेत.

थकवा जाणवत असल्याने अजित पवार ४ दिवस होम क्वॉरन्टाईन होते. परंतु कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अजित पवार यांना 26 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आठवडाभर उपचार घेतल्यानंतर आज ते कोरोनातून बरे होऊन घरी परतले.

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार दोन आठवड्यांपूर्वी पुणे, इंदापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना थोडा थकवा जाणवत होता. तरीही त्यांनी शनिवारी (17 ऑक्टोबर) बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. हा दौरा आटोपून परतल्यानंतर त्यांना तापही आला होता. त्यामुळे कोरोना चाचणी केली. ती निगेटिव्ह आली असली तरी थकवा असल्याने त्यांनी घरीच राहून आराम करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु 26 ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं.

कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment