‘भाऊ म्हणून मी नेहमीच तुझ्यासोबत आहे.. ‘ धनंजय मुंडेंची बहीण पंकजाला भावनिक साद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षण वाढल्याने पंकजा यांनी आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्याचे मंत्री आणि पंकजा याचे भाऊ धनंजय मुंडेंनी बहीण पंकजाच्या प्रकृतीसंबंधी चिंता व्यक्त केली आहे. ट्विटरवर एक भावनिक ट्विट करत त्यांनी पंकजाला काळजी घेण्यास सांगितलं असून या क्षणी आपण सोबत असल्याचे म्हटलं आहे.

”पंकजाताई मी स्वतः करोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; करोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे,” अशी भावनिक साद घालत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भगिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ट्विटला रिट्विट केलं आहे.

पंकजा मुंडे यांनी स्वतःला सर्दी खोकला व ताप याचा त्रास होत असल्याच्या माहिती ट्विट करीत दिली होती. ‘पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरिषजी बोराळकर यांना पहिल्या पसंदीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,’ असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले होते. या ट्विट ला कमेंटसह धनंजय मुंडे यांनी री ट्विट केले असून पंकजा मुंडे यांना काळजी घेण्याचे सांगत एकप्रकारे भावनिक सादच घातली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment