प्रताप सरनाईकांचे बिझनेस पार्टनर अमित चांदोळेंना ईडीकडून अटक, सलग 12 तास चौकशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचे बिझनेस पार्टनर अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अमित चांदोळे यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. अमित चांदोळे यांच्या अटकेनंतर आता प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टॉप्स सिक्युरिटी या खासगी कंपनीशी संबंधित अमित चांदोळे यांना अटक केली आहे. आर्थिक अनियमितता असल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. 12 तासांच्या चौकशीनंतर अमित यांना अटक करण्यात आली आहे. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय समजले जातात.

नेमकं प्रकरणं काय?
ईडीने मंगळवारी (24 नोव्हेंबर) प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आपण परदेशातून आल्याने ८ दिवस आपल्याला सक्तीने क्वॉरंटाईन राहावं लागत आहे.

शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी ईडीला कळवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे सरनाईक आज ईडीसमोर चौकशीला हजर राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सरनाईक यांनी ईडीला पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती केली असली तरी अजून त्यावर ईडीने काही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ईडी काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक मुंबईत नव्हते. ते भारताबाहेर होते. मात्र, ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते भारतात आले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं. (ED Arrested Amit Chandole in an alleged money laundering case)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment