बिहार विधानसभा दंगल: लालूपुत्र तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यावर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा । राष्ट्रीय जनता दलाचे माजी नेते शक्ती मलिक यांच्या हत्ये प्रकरणी बिहार पोलिसांनी रविवारी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राजदचे नेते तेजप्रताप यादव व अनिल कुमार साधू यांच्यासह ६ जणांविरोधात एफआयआरची नोंद केली आहे. राजदसाठी बिहारमध्ये विधनासभा निवडणुकीच्या हा एक मोठा झटका बसला आहे.

मलिक यांच्या कुटुंबाकडून नोंदवल्या गेलेल्या तक्रारावरून तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव, अनिल कुमार साधु यांच्यासह ६ जणांविरोधात षडयंत्र रचून हत्या केल्याचा आरोप करून, एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पूर्णियाचे पोलीस अधीक्षक विशाल शर्मा यांनी एफआयआर नोंदवण्यात आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.

राजदचे माजी नेते शक्ती मलिक यांची रविवारी सकाळी हल्लेखोरांनी घरात घुसून गोळ्या घालून हत्या केली. यानंतर मलिक यांच्या पत्नीने या प्रकरणी सायंकाळी तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव आणि अनिल कुमार साधु यांच्यासह सहा जणांविरोधात तक्रार नोंदवली. मलिक यांच्या कुटुंबीयाचा आरोप आहे की ही लोकं मलिक शक्ती मलिक यांना जीवे मारण्याची सातत्याने धमकी देत होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment