नग्नावस्थेतील व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करत तरुणींच्या टोळीनं केलं अनेकांना ब्लॅकमेल; पुण्यातील धक्कादायक प्रकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात लॉकडाउनच्या काळात सायबर गुन्ह्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही तरुणींनी तरुणांशी आधी मैत्री केली आणि नंतर आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल केले. आता या अज्ञात तरुणींनी या तरुणांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे घाबरलेल्या ८ जणांनी सायबर विभागाकडे धाव घेत तक्रार केली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, जून आणि ऑगस्ट महिन्यात ही घटना घडली आहे. विशेषतः २५ ते ४०  वयोगटातील शालेय शिक्षक, नोकरदार लोकांना यामध्ये लक्ष्य करण्यात आले आहे. तरुणींनी तरुणांसोबत केलेले नग्नावस्थेतील व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केले असून ते इतर ठिकाणी अपलोड करण्याची धमकी देऊन त्या या तरूणांकडून पैसे उकळत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या  माहितीनुसार, या तरुणांची सोशल मीडिया साइटवर या तरुणींशी ओळख झाली आणि त्यांनी आपला मोबाईल नंबर या तरुणींना  दिला. त्यानंतर पुढे त्यांच्यासोबत  व्हॉट्सअ‍ॅपवर गप्पा सुरू झाल्या. काही दिवसांनी व्हिडिओ कॉल सुरू झाले. व्हॉट्सअ‍ॅपवर मैत्री वाढल्यानंतर या तरुणींनी आपले न्यूड व्हिडिओ या तरुणांना शेअर केले. हा प्रकार इथेच थांबला नाही तर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल करून तरुणांसोबत न्यूड होऊन गप्पा मारल्या. पण, या तरुणींनी हे सर्व व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केले होते. त्यानंतर या तरुणांना धमकीचे फोन येण्यास सुरुवात झाली. ‘पैसे द्या नाहीतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू’, अशी धमकीच या तरुणांना देण्यात आली. धमकीचे फोन आल्यामुळे या तरुणांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण आता पुरते जाळ्यात अडकलो गेलो आहे. त्यामुळे पैसे देण्यावाचून पर्याय नसल्यामुळे काही जणांनी यूपीआय आणि ऑनलाइनद्वारे पैसेही ट्रान्सफर केले होते.

या ८ जणांपैकी काही जणांनी सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याआधी दोन तीन वेळा धमकी देणाऱ्यांना पैसे ट्रान्सफर केले होते. ५ ते २० हजारांपर्यंत या तरुणांकडून पैशांची मागणी करण्यात आली होती. यातील काही तरुणांनी धमकीचे फोन सतत येत असल्यामुळे पोलिसांमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. तर काही जणांनी नाहक बदनामी होईल या भीतीने तक्रार दाखल करण्यास टाळले. या तरुणांना प्रथम सोशल मीडिया साइटवर हेरण्यात आले होते. त्यानंतर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यांच्यासोबत संवाद साधून मैत्री वाढवण्यात आली. त्यानंतर समोरील तरुणाकडून त्याचा मोबाईल नंबर मागण्यात आला. जेव्हा या तरुणाने आपला मोबाईल नंबर समोरील तरुणीला दिला. त्यानंतर एसएमएस, व्हॉट्सअप गप्पा सुरू झाल्या. आणि पुढे सर्व प्रकार घडला. सायबर पोलिसांनी या तरुणांची तक्रार दाखल केली असून धमकी देणाऱ्या तरुणींचा शोध सुरू केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment