अरे बापरे !!! गूगल वर राशीद खानची पत्नी म्हणून अनुष्का शर्माचं नाव ??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खरं तर तुम्हालाही हे ऐकून आणि पाहून आश्चर्य वाटेल की जर तुम्ही अफगाणीस्तान चा स्टार क्रिकेटर राशिद खानची पत्नी असं गुगल सर्च केलं तर तुम्हाला अभिनेत्री अनुष्का शर्मा असं उत्तर मिळेल. तुम्ही फक्त राशिद खान वाईफ असं गुगल बारमध्ये सर्च करा मग तुम्हाला गुगल अनुष्का शर्माच्या नावासोबत तिचा फोटो देखील दिसेल. पण खरं तर अभिनेत्री अनुष्का शर्मा क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी आहे. तेव्हा तीचं नाव राशिदची पत्नी म्हणून कसं येतंय हे जाणून घ्यायचं असेल तर वाचुया ही संपूर्ण बातमी

आफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानचा जन्म १९९८ चा आहे. रशीद खान एक सर्वोत्कृष्ट फिरकीपटू आहे.तो सगळ्यात तरुण क्रिकेटर आहे जो २० व्या वर्षी टेस्ट मॅचमध्ये कॅप्टन म्हणून राहिला होता.

दुसरीकडे अनुष्का शर्मा विषयी सगळ्यांनाच माहित आहे. तीने ‘बँड बाजा बारात’, ‘पीके’, ‘रब ने बनादी जोडी’, ‘ए दिल है मुश्किल’ सोबत अनेक सिनेमात काम केलं आहे. तीने इटलीमध्ये क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न देखील केलं आहे आणि आता ती लवकरंच आई देखील होणार आहे.

मात्र असं असतानाही गुगलमध्ये राशिद खानची पत्नी असं सर्च केल्यावर अनुष्का शर्माचं नाव आणि राशिद विवाहीत असल्याचं दाखवत आहे. आणि लग्नाच्या तारखेत विराट.सोबतच्या लग्नाची तारीख दाखवली जात आहे. राशिदने एकडा लाईव्ह चॅटमध्ये त्याची आवडती अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि प्रिती झिंटा असल्याचं म्हटलं होतं तेव्हापासून तो चर्चेत आलाय.

सांगायची गोष्ट अशी की गुगल दाखवत असल्याप्रमाणे अनुष्का राशिदची पत्नी नाहीये. राशिद खानचं लग्नच झालेलं नाही..त्याने एका मुलाखतीत हे देखील सांगितलं होत की तो जेव्हा आफगाणिस्तान वर्ल्ड कप जिंकेल तेव्हाच लग्न करेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment