सुरतमधील ONGC प्लांटला भीषण आग; स्फोटांनी परिसर हादरला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सुरत । सूरत येथील ऑइल अँड न्यॅचुरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ओनजीसी) प्लांटला भीषण आग लागली आहे. गुरुवारी रात्री ही भीषण आग लागली. येथील हाजिरामधील प्लांटच्या ठिकाणी रात्री तीनच्या सुमारास तीन मोठे स्फोट झाले. दोन टर्मिनल्सवर झालेल्या या स्फोटांनंतर मोठ्या आगीच्या ज्वाला अगदी दूरवरुनही दिसत होत्या. यासंदर्भातील व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटवरुन पोस्ट केला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणताही जिवीतहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.

या प्रकल्पाशी संबंधित असणाऱ्या डॉक्टर धवल पटेल यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास प्लांटच्या टर्मिनल्समध्ये लागोपाठ ३ मोठे स्फोट झाले. त्यानंतर येथील टर्मिनल दोनला आग लागली. या अपघातामध्ये कोणतीही जिवितहानी झाल्याचे प्राथमिक वृत्त हाती आलेले नाही. सध्या या प्रकल्पामध्ये साठवून ठेवण्यात आलेला नैसर्गिक गॅसचा साठा डिप्रेशराइज करण्याचे काम सुरु आहे असं पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. ओएनजीसीच्या सूरतमधील प्लांटमध्ये यापूर्वीही आगीच्या घटना घडल्या आहेत. २०१५ साली इथं लागलेल्या आगीत १२ जण जखमी झाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

 

 

Leave a Comment