नीरव मोदीच्या पत्नीविरोधात इंटरपोलने बजावली रेड कॉर्नर नोटीस

मुंबई । पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी याची पत्नी ऍमी मोदी हिच्या विरोधात इंडिटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. भारतातील मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी इंटरपोलकडून ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. इंटरपोलकडून याआधी नीरव मोदीचा भाऊ नेहल आणि बहिण पूर्वी यांच्याविरोधातही नोटीस काढण्यात आली आहे. इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस एका प्रकारे आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट असतो. यानंतर प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला वेग येईल. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याची आणि त्याच्या कुटुंबियांचा सक्तवसुली संचनालयनाकडून (ED) मनी लाॅंडरिंगच्या संशयाने तपास सुरु आहे. याच प्रकरणी नीरव मोदी याची पत्नी ऍमी मोदी हिची चौकशी करण्यासाठी ईडीने इंटरपोलला सहकार्य करण्याची विनंती केली होती. ऍमी मोदी विरोधात नोटीस बजावण्याची विनंती ईडीने इंटरपोलला केली होती. त्यानुसार आज इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे.

नीरव मोदीची पत्नी अमी मोदीला २०१९ मध्ये अमेरिकेत पाहण्यात आलं होतं. तपास यंत्रणांना सध्या ती नेमकी कुठे आहे याबद्दल खात्रीलायक माहिती नाही. दुसरीकडे पंजाब बँक घोटाळा करुन फरार झालेल्या नीरव मोदीच्या कोठडीत २७ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीला ब्रिटनमधील न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्यात आलं होतं. गतवर्षी मार्च महिन्यात अटक झाल्यापासून नीरव मोदी लंडनमधील वांड्सवर्थ कारागृहात बंद आहे.

याआधी नीरव मोदीच्या कोठडीत ६ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली होती. नीरव मोदीचं भारतात प्रत्यार्पण करण्यावरुन सध्या सुनावणी सुरु आहे. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेसोबतच इतर जवळपास कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भारतात वेगवेगळ्या यंत्रणांनी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत. याप्रकरणी नीरव मोदीसोबत मेहुल चोक्सीही फरार आहे. ईडीने जुलै महिन्यात नीरव मोदीविरोधात मोठी कारवाई केली होती. ईडीकडून नीरव मोदीची कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. जप्त केलेल्या संपत्तीत मुंबईतील वरळीमधील समुद्र महल येथील चार फ्लॅट, फार्म हाऊस, अलिबागमधील जमीन, लंडनमधील फ्लॅट, युएईमधील घर आणि इतर गोष्टींचा समावेश होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com