महाराष्ट्रात सरकारचे अत्याचार वाढलेत ; केंद्राने हस्तक्षेप करण्याची कंगणाची केंद्राला मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि कंगना राणौत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. अशातच मुंबई महानगरपालिकेने कंगना राणौतच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई केल्यानंतर हा वाद आणखीनच चिघळला. ऑफिस वर कारवाई केल्यानंतर कंगना अजून आक्रमक झाली असून ती रोज नवनवीन ट्विट करून ठाकरे सरकार वर ताशेरे ओढत आहे.

नुकतंच कंगणाने एक ट्विट करून म्हणलं आहे की महाराष्ट्रात राज्य सरकारचे अत्याचार आणि दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रात हस्तक्षेप करावा, अशी मागणी कंगनाने केली आहे.

कंगनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये काही शिवसैनिक एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करत असल्याचा दावा कंगनाने केला आहे. या व्यक्तीने सरकारवर टीका करणारा संदेश पाठवल्याने त्याला मारहाण झाल्याचे कंगनाचे म्हणणे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment