पंकजा मुंडे आल्या गोत्यात! ऑनलाईन दसरा मेळाव्याप्रकरणी गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड । ऑनलाईन दसरा मेळावा घेतल्याप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे अडचणीत आल्या आहेत. पंकजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये 40 ते 50 जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, खासदार भागवत कराड यांचाही समावेश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी सावरगावमध्ये ऑनलाईन दसरा मेळावा घेतला होता. या मेळाव्यासाठी कोणीही हजर राहू नये, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यामुळे गावातील लोकांशिवाय बाहेरचे कुणी फारसे लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. मात्र, पंकजा मुंडे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी कोणतंही सोशल डिस्टन्स पाळलं नाही. आपत्ती व्यवस्थापना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन त्यांनी केले नाही.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पाथर्डीच्या आमदार मोनिका राजुरे, जिंतूरच्या मेघना बोर्डीकर, भीमराव धोंडे, सविता गोल्हार, विजय गोल्हार, सुवर्णा लांबरुड, संदेश सानप, राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे आणि अन्य 40-50 जणांचा समावेश आहे. कलम 188, 269, 270 सह कलम 51(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment