कोरोनामुळं कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नाही, म्हणून अर्णब यांनाही.. – गृहमंत्री देशमुख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना संकटात कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नाही. गेली ४ महिने कैदी आपल्या नातेवाईकांना भेटले नाहीत. त्यामुळं अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबाला तुरुंगात भेटता येणार नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. अर्णब गोस्वामींच्या सुरक्षेची चौकशी करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशमुखांना फोन केला होता. अर्णब यांना कुटुंबियांना भेटु द्यावे असे ते म्हणाले. त्यावर अनिल देशमुखांनी आपलं उत्तर दिलं.

राज्यपालांचा मला फोन आला होता. अर्णब यांना कुटुंबियांना भेटू द्याव असं त्यांनी म्हटलं. पण तुरुंगात जाऊन भेटण्यास कोरोनाकाळात बंदी आहे. त्यामुळे अर्णब यांचे कुटुंबीय फोनवरुन बोलणी करु शकतात. अर्णब यांची काळजी करण्याची गरज नाही. ते सुरक्षित आणि सुस्थितीत असल्याचेही देशमुख म्हणाले.

दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत अर्णव गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीची अर्ज फेटाळला. ना जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता अर्णव यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे.

या प्रकरणात जामीन दिल्यास ही प्रथा पडून जाईल आणि कोणीही उठसूठ उच्च न्यायालयात येऊन जामिनासाठी अर्ज करेल, असं मतही कोर्टाने व्यक्त केलं. तसेच जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देशही कोर्टाकडून देण्यात आले आहेत. कोर्टाच्या या स्पष्ट निर्देशामुळे आता अर्णव यांच्या वकिलांना जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर त्यावर सत्र न्यायालय निर्णय देईल. तोपर्यंत अर्णव यांना तळोजा तुरुंगातच राहावं लागणार आहे.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment