मोठी बातमी! राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्री मंडळामधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागणी झाली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी शिंदे यांनी कोरोनाची टेस्ट केली होती त्यानंतर आजच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

यापूर्वी ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख यांना करोनाची लागण झाली होती. त्यातून बरे होऊन हे तिन्ही मंत्री पुन्हा कामाला लागले आहेत. तर, एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाची लक्षणं जाणवल्यानंतर कोरोनाची टेस्ट केली त्यानंतर एका दिवसात या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती ठिक असून गेल्या काही दिवसांत त्यांच्या सपंर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा शिंदे मतदारसंघात फिरत होते. तसंच, भिवंडी इमारत दुर्घटनेनंतर एकनाथ शिंदे हे प्रत्यक्ष घटनास्थळी हजर होते. इमारत कोसळ्याचे वृत्त कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. भिवंडी महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलेल्या जखमींची ही त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली होती. दरम्यान, मंगळवारी झालेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील चर्चेतही एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. त्यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. त्यामुळं सततच्या संपर्कामुळं शिंदेंना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

Leave a Comment