माझ्या गाडीला हात लावायची विश्वास नांगरे पाटलांची पण हिम्मत नाही ; पहा कोणी दिली अशी धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सकलेन मुलाणी । कराड

कराड । विश्वास नांगरे पाटील असो किंवा अन्य कोण आर टी ओ कुणाचीच माझ्या गाडीला हात करायची हिम्मत नाही, अशी धमकी तालुका पोलिस ठाण्यातील महिला फौजदारास खासगी प्रवासी वाहतूक करणारया बस व्यवसायिकाने दिली. संबधिताने केवळ धमकी दिली नाही तर तो त्या महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. उंडाळे येथील भरचौकात प्रकार झाला. त्याची भागात चर्चा अशून त्यामुळे खळबळ उडाली आहे. विजय चिंचोळकर (रा. राजंणवाडी, ता. शिराळा) याच्यावर त्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

फौजदार दीपज्योती पाटील यांनीत्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, रविवारी सायंकाळी उंडाळे येथे ट्रव्हल्स कंपनीच्या सहा बस उभ्या होत्या. त्यावेळी रयत साखर कारखान्याला जाणारे ट्रॅक्टर व आठवडी बाजारामुळे तेथे वाहतूक कोंडी होती. त्याबाबत काही नागरिकांनी उंडाळे पोलिस दूरक्षेत्रच्या पोलिस उपनिरीक्षक दिपज्योती पाटील यांना माहिती दिली. त्यांनी तेथे येऊन ट्रव्हल्सचे मालक विजय चिंचोळकर यांना गाड्या बाजूला काढण्यास सांगितले. मात्र चिंचोळकर यांनी पोलीसांशी वाद घालण्यास सुरवात केली.

विश्वास नांगरे पाटलांसह कुठल्या आरटीओची हिम्मत नाही माझ्या गाड्यांना हात करायची, वर्दी तुला घमेंडी आहे का, अशी सज्जड धमकी देत ट्रॅव्हल्स मालक त्यांच्या अंगावरहीलधावून गेला. भर चौकात प्रकार सुरू होता. त्यामुळे नागरीकही जमा झाले. यावेळी त्याने पोलीसांना धक्का बुक्की करण्याचा प्रकारही झाला. त्याबाबत पोलिस उपनिरीक्षक दिपज्योती पाटील यांनी कऱ्हाड तालुका पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हाही दाखल झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment