भाजप धार्मिक, वांशिक ध्रुवीकरण करून राजकीय फायदा उठवेल असं मनमोहनसिंह एकदा बोलले होते- ओबामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन । ”भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह  (Manmohan Singh) यांनी एकदा माझ्याशी बोलताना भारतातील मुस्लिमविरोधी लाटेमुळे भाजपच्या वाढत्या ताकदीविषयी चिंता व्यक्त केली होती.” बराक ओबामा (Barack Obama) यांनी ‘अ प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land) या पुस्तकात 2010 मध्ये भारत दौऱ्यावर असतानाचा एक किस्सा सांगितला आहे.

भारतामध्ये धार्मिक आणि वांशिक ध्रुवीकरण उन्माद निर्माण करणारे ठरेल. अशा गोष्टींचा फायदा उठवणे राजकारण्यांसाठी फार अवघड नसते, असे मनमोहन सिंग यांनी ओबामा यांना सांगितले होते. डिसेंबर 2010 मधील भारत दौऱ्यावर असतानाचा आणखी एक किस्सा त्यांनी आपल्या पुस्तकात सांगितला आहे. त्यावेळी बराक ओबामा यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या मेजवानीला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेदेखील उपस्थित होते.

“ही मेजवानी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. डॉ. मनमोहन सिंग यांचा थोड्या थोड्या वेळाने पाण्याचा घोट घेत झोप घालवण्याचा प्रयत्न माझ्या नजरेतून सुटला नाही. त्यामुळे उशीर होत असल्याचे माझ्या लक्षात आले. निरोप घेण्याची वेळ आली अस मी मिशेलला खुणावलं. पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नी आम्हाला सोडायला कारपर्यंत आल्या. त्या मंद उजेडात मला थकलेले पंतप्रधान त्यांच्या वयापेक्षा अधिक वृद्ध वाटले. तिथून निघताना ही व्यक्ती पदावरून पायउतार झाल्यानंतर कसं होईल हाच प्रश्न माझ्या मनात घोळत होता” असे बराक ओबामा यांनी पुस्तकात म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment