मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनाच्या हाकेमुळे पंढरपूरात कर्फ्यू!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपूर । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चानं 7 नोव्हेंबरला पंढरपुरातून आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 6 नोव्हेंबर रात्री 12 वाजल्यापासून ते 7 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत पंढरपूरमध्ये संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

संचारबंदी काळात पंढरपूर शहरात 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर पंढरपूर शहराकडे जाणाऱ्या सर्व बसेस बंद राहणार आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आक्रोश आंदोलनात गर्दी होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत. (Maratha Kranti Thok Morcha announce Akrosh morcha on 7 november, District collector imposes curfew)

मराठा क्रांती मोर्चाकडून पंढरपूर ते मंत्रालय असा पायी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून पंढरपूर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाद्वार घाट ते नामदेव पायरी परिसर, चौफळा ते पश्चिम द्वार परिसर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रदक्षिणा मार्ग, अशा अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment